रेपो, रिव्हर्स रेपो दर कायम

रेपो, रिव्हर्स रेपो दर कायम

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात वाढती महागाई आणि चलनवाढ लक्षात घेता रेपो रेट 4 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो 3.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
  • वर्ष 2021-22 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढ 9.5 टक्के तर चलनवाढीचा दर 5.7 टक्के असेल.
  • चलनवाढ चार टक्क्यांपर्यंत मर्यादित राहत नसल्याने व्याजदर तोच ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.
  • मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर व बँक दर देखील 4.25 टक्क्यांवर कायम असतील.
  • रेपो, रिव्हर्स रेपो, बॅंक रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ही आरबीआयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने आहेत.

RBI च्या पतनियंत्रणाची साधने (यालाच पतनियंत्रणाचे धोरण म्हणतात.)

संख्यात्मक साधने

  • रेपो व रिव्हर्स रेपो
  • वैधानिक रोखता प्रमाण
  • रोख राखीव प्रमाण
  • खुल्या बाजारतील रोखांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार (OMO)
  • मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF)
  • संख्यात्मक साधनांचा परिणाम प्रत्यक्ष पतचलनाच्या/पतपैशाच्या संख्येवर प्रमाणावर होतो.

गुणात्मक साधने

    • नैतिक समजावणी
    • कर्ज रक्कम व तारण यातील गाळा —-
    • उपभोग कर्जाचे नियंत्रण
    • कर्जाचे रेशनिंग
    • आदेशाद्वारे नियंत्रण
    • प्रत्यक्ष कारवाई

 

गुणात्मक उद्देश – 

 

  • अर्थव्यवस्थेतील हानीकारक, सट्टेबाजी अनावश्यक, वस्तू उत्पादन
  • अनुत्पादक उपभोग उत्पादक क्षेत्राकडे वळविणे
  • पतचलनाची दिशा ठरवितात

Contact Us

    Enquire Now