रिझर्व्ह बँकेद्वारे पी. वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन

रिझर्व्ह बँकेद्वारे पी. वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन

  • न्यू अंब्रेला एंटिटी अर्थात खासगी कंपन्यांना स्वत:ची देणी (Payment) व्यवस्था निर्माण करण्यासाठी येणाऱ्या अर्जाची छाननी व परवान्यांच्या शिफारसीसाठी रिझर्व्ह बँकेने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
  • या समितीचे अध्यक्ष पी. वासुदेवन असणार आहे.
  • न्यू अंब्रेला एंटिटी (New Umbrella Entity)
  • ही रिझर्व्ह बँकेची एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे. ज्यामध्ये खासगी कंपन्या स्वत:ची पेमेंट व्यवस्था सुरू करू शकतात.
  • नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पेमेंट सुविधेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी याद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.
  • यासाठी खासगी कंपनीला आपले किमान भांडवल ५०० कोटी असणे आवश्यक आहे तसेच एकाच प्रवर्तकाला ४० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येणार नाही.

Contact Us

    Enquire Now