रिझर्व्ह बँकेचे व्याजदर स्थिरच –
- अपेक्षेप्रमाणे स्थिर व्याजदराचा निर्णय घेणाऱ्या रिझर्व्ह बँकेचा व्याजदर स्थिर असला तरीही देशाच्या विकासदराबाबतचा अंदाज मात्र उंचावला आहे.
- मात्र पतधोरणाच्या निमित्ताने देशासमोर महागाईचे आव्हान कायम असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
- चालू वित्त वर्ष 2020-21 साठी यापूर्वी उणे 9.5 टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर जाहीर करणाऱ्या रिझर्व्ह बँकेने आता हा अंदाज काहीसा सुधारून उणे 7.5 टक्क्यांचा बांधला आहे.
- विद्यमान वित्त वर्षाच्या शेवटच्या दोन्ही तिमाहीत विकासदर शून्याच्या आसपासच राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये तो 0.1 टक्के, जानेवारी ते मार्च 2021 मध्ये तो 0.7 टक्के असेल.
- चालू आर्थिक वर्षाचा पहिल्याच तिमाहीत विकास दर उणे 23.9 टक्क्यांपर्यंत रोडावला तर दुसऱ्या तिमाहीत तो उणे 7.5 टक्के नोंदला गेला.
- व्याजदर किमान सलग 3 दिवस चालणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख रेपो दर 4 टक्के असा किमान पातळीवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला.
- चालू वर्षात आत्तापर्यंत 1.11 टक्के दरकपात झाली आहे.
- यापूर्वीची दरकपात 22 मे रोजी झाली.
रिझर्व्ह बँक उवाच –
- संपर्करहित कार्ड व्यवहार मर्यादा 5000 रुपयांपर्यंत
- अविरत आरटीजीएस सेवेला येत्या काही दिवसांतच सुरुवात.
- मोठे उद्योग, वित्त संस्थांच्या बँक परवान्याबाबत सकारात्मक
- तंत्रस्नेही रक्कम देय सुरक्षित नियंत्रण निर्देश जारी करणार.
वाढत्या महागाईचे आव्हान कायम –
- प्रामुख्याने अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे किरकोळ महागाईचा दर 2020-21 मध्ये 6 टक्क्यांच्या आसपास असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- मध्यवर्ती बँकेच्या सहनशील अशा 4 टक्क्यांपुढे असणारा महागाई दर दुसऱ्या तिमाहीत 6.8 टक्के, तर तिसऱ्या तिमाहीत 5.8 टक्के असेल.
- सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या पहिल्या अर्धवर्षात तो 5.2 ते 4.6 टक्के असेल असे नमूद करण्यात आले.
रेपो दर
- RBI इतर बँकांना (बँकांकडून शासकीय प्रतिभूती खरेदी करून किंवा त्यांचा पुनर्वटाव करून) आपत्कालीन कर्ज देते. या कर्जावर रिझर्व्ह बँक जे व्याज आकारते त्या व्याजाला रेपो दर असे म्हणतात.
- 2 ते 56 दिवसांसाठी ही रेपो कर्जे दिली जातात आणि 5 कोटींच्या पटीमध्ये दिली जातात.
- बाजारामध्ये आपत्कालीन तरलता निर्माण करणे हे रेपो दराचे उद्दिष्ट आहे.