राहुल बजाज यांचा राजीनामा, नीरज बजाज ‘बजाज ऑटो कंपनी’चे नवे अध्यक्ष

राहुल बजाज यांचा राजीनामा, नीरज बजाज ‘बजाज ऑटो कंपनी’चे नवे अध्यक्ष

 • मागील पाच दशकांपासून कार्यरत असलेले बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपले वय लक्षात घेऊन पदाचा राजीनामा दिला आहे.
 • त्यानंतर कंपनीचे कार्यकारी संचालक नीरज बजाज यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते 1 मे पासून आपला पदभार स्वीकारतील.
 • राहुल बजाज 1972 पासून कंपनीसोबत कार्यरत होते. राहुल बजाज यांचे कंपनीमध्ये उल्लेखनीय योगदान आहे. त्यांचा पाच दशकांहून अधिक काळचा अनुभव आणि त्यांची कंपनीशी असणारी बांधिलकी यामुळे ते कायम कंपनीशी जोडलेले राहतील.
 • कंपनीने त्यांना चेअरमन एमिइंट (मानद) म्हणून येत्या पाच वर्षांसाठी नियुक्त केले आहे. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि शिकवणुकीचा फायदा यापुढेही होत राहील. ते सल्लागार म्हणून सदैव कंपनीच्या सोबत असतील.

राहुल बजाज यांच्याबद्दल थोडक्यात 

 • 10 जून, 1938 साली जन्म झालेल्या राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.
 • हावर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. 
 • 1968 मध्ये राहुल बजाज हे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बजाज ऑटोमध्ये रुजू झाले होते.
 • 1972 मध्ये त्यांनी बजाज ऑटोची सूत्रे हाती घेतली होती.
 • बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचे मोठे योगदान आहे.
 • 2001 मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • फ्रान्स सरकारने ‘नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

Contact Us

  Enquire Now