
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या वर्षपूर्ती निमित्ताने शिक्षण क्षेत्रासाठी नवीन उपक्रम
- राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० अंतर्गत सुधारणांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका परिषदेत शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
- या उपक्रमाचा उद्देश भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा आहे.
- या परिषदेत पंतप्रधानांनी कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग (DIKSHA) आणि स्टडी वेब्स् फॉर ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग इन्स्पायरिंग माइंड्स् (स्वयम्) यांसारख्या पोर्टल्सने घेतलेल्या भूमिकेचीही नोंद घेतली.
शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट :
अ) कोणत्याही कोर्समध्ये विद्यार्थ्याने मिळवलेले क्रेडिट ठेवणारी एक डिजिटल बँक
ब) उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रवेश आणि निर्गमन पर्याय प्रदान करेल.
प्रादेशिक भाषांत अभियांत्रिकी :
अ) आठ राज्यांतील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांत ५ भारतीय भाषांत अभियांत्रिकी अभ्यास – मराठी, बांगला, तमिळ, तेलुगू आणि हिंदी.
ब) शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेवर भर दिल्यामुळे गरीब ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.
क) एआयसीटीई संसाधनांचा डेटाबेस तयार करत आहे जेणेकरून महाविद्यालये प्रादेशिक भाषांमध्ये अधिक उपक्रम राबवू शकतील तसेच अभियांत्रिकी सामग्रीचे ११ भाषांत भाषांतर करण्यासाठी साधनही विकसित करत आहे.
विद्याप्रवेश आणि सफल :
अ) इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी खेळांवर आधारित तीन महिन्यांच्या शालेय तयारी वर्गाचा समावेश असेल.
ब) सफल (स्ट्रक्चर्ड असेसमेंट फॉर ॲनलायझिंग लर्निंग लेव्हल्स) सीबीएसई शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेवर आधारित मूल्यांकन चौकट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाला वाहिलेले संकेतस्थळ यांचा समावेश असेल.
NDEAR : राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आर्किटेक्चर
- शिक्षणतज्ज्ञांना प्रतिभा आणि क्षमतेच्या आधारावर मूल्यमापन करण्यास व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात व्यवसायात वापरता येण्याजोगे वैशिष्ट्यांचे क्षेत्र निवडण्यास मदत करेल.
राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंच :
अ) हे केंद्र व राज्य सरकारच्या एजन्सींना तंत्रज्ञानावर आधारित हस्तक्षेपानंतर स्वतंत्र पुरावा आधारित सल्ला प्रदान करेल.
ब) तळागाळात शैक्षणिक स्तरावर तंत्रज्ञानाचा वापर सुधारण्यावर विशेष भर
क) यास सरकारकडून निधी दिला जाईल मात्र नंतरच्या टप्प्यात खासगी निधी आणि उद्योग संस्थांकडून पाठिंबा मागवला जाईल.
निष्ठा २.० :
अ) हे शिक्षकांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देईल, जे विभागाला सूचना देऊ शकतील.
ब) त्यात १२ जेनेरिक आणि ५६ विषय – मॉड्यूलसह ६८ मॉड्यूल असतील ज्यात १० लाख शिक्षकांचा समावेश असेल.
क) ‘निष्ठा’ हा शिक्षकांना प्रशिक्षण देणारा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.
विषय म्हणून सांकेतिक भाषा :
अ) भारतीय सांकेतिक भाषेला प्रथमच भाषा विषयाचा देण्यात आला आहे.
ब) ३ लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणासाठी सांकेतिक भाषा आवश्यक आहे.
क) यामुळे भारतीय सांकेतिक भाषेला चालना मिळेल आणि दिव्यांग लोकांना मदत होईल.
शिक्षणासंबंधित इतर उपक्रम :
१) मध्यान्ह भोजन योजना (१९९५)
२) सर्व शिक्षा अभियान (२०००-०१)
३) शिक्षणाचा अधिकार कायदा, २००९
४) पढे भारत, बढे भारत (२०१४)
५) समग्र शिक्षा योजना (२०१८)
६) राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (२०१३)
७) SPARC : Scheme for Promotion of Academic and Research Collaboration
८) उडान
९) सक्षम योजना (२०१४)