
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
- देशभरात ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
- ११ मे १९९८ रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानातील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-१ या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. या मिशनला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव देण्यात आले होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदंबरम, डॉ. अनिल काकोडकर हे या चाचण्यांचे शिल्पकार होते.
- या यशस्वी चाचणीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले. २२ वर्षांपूर्वी भारताने केलेल्या या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी १९९९ पासून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो.
- ११ मे हा दिवस इतिहासात १९९८ ची पोखरण अणुचाचणी आणि अंतराळातील भारताची मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. अणुबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. भारताने ही अणुचाचणी गुप्तपणे केली होती.