राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ४ वर्षांत ६३ विधेयकांना मंजुरी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ४ वर्षांत ६३ विधेयकांना मंजुरी

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २५ जुलै रोजी त्यांच्या कार्यकालातील चार वर्षे पूर्ण केली.
 • यावेळी त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण कार्याचा अहवाल इ-पुस्तिकेद्वारे सादर करण्यात आला.

इ-पुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या कार्याचा अहवाल :

१) कोविंद यांनी केंद्र सरकारची ४३ राज्य सरकारांची २० अशा ६३ विधेयकांना चार वर्षांत मंजुरी दिली आहे.

२) त्यांनी १३ राज्ये, २ केंद्रशासित प्रदेश तसेच ७८० लोकांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटी दिल्या आहेत.

३) २३ परदेशी राजदूतांची अधिकारपत्रे स्वीकारली आहेत.

४) संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती म्हणून अनेकदा राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

५) अंदमान-निकोबारच्या स्वराज दीप संचलनाची सलामी त्यांनी स्वीकारली होती.

६) कर्नाटकातील जनरल थिमय्या म्युझियमचे उद्‌घाटनही त्यांनी केले होते.

७) तसेच राज्यघटनेचे रक्षणकर्ते म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडली.

८) राष्ट्रपती भवनात ‘ॲट होम’ सोहळ्याच्यावेळी कोरोना योद्धांचा सन्मान केला.

९) परिचारिका संघटना, लष्करी परिचर संघटना, राष्ट्रपती आस्थापना दवाखाना परिचर यांसमवेत रक्षाबंधन साजरे केले होते.

रामनाथ कोविंद

 • जन्म : १ ऑक्टोबर १९४५
 • भारताचे १४वे राष्ट्रपती तर उत्तरप्रदेशातील राष्ट्रपती म्हणून कार्य करणारे पहिले व्यक्ती
 • पदाची शपथ : २५ जुलै २०१७

कारकीर्द :

 • १९७७-७९ : दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील
 • १९७७-७८ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे वैयक्तिक सहाय्यक
 • १९७८ : सर्वोच्च न्यायालयात वकील
 • १९८०-९३ : सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे स्थायी वकील
 • १९९१ : भारतीय जनता पक्षात सामील
 • १९९४-२००६ : संसद सदस्य, राज्यसभा
 • ऑक्टोबर २००२ : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले.
 • २०१५-१७ : बिहारचे २६वे राज्यपाल

राष्ट्रपती :

 • कलम ५२ : भारताचे राष्ट्रपती
 • कलम ५३ : 

(१) संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असतील.

(२) राष्ट्रपती, संघराज्याच्या संरक्षण दलांचे सरसेनापती असतील.

 • कलम ५४ : राष्ट्रपतींची निवडणूक –

१) संसदेतील निर्वाचित सदस्य

२) सर्व राज्यांतील विधानसभांचे सदस्य

३) दिल्ली व पुदुच्चेरी विधानसभांचे निर्वाचित सदस्य

 • कलम ५५ : राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत – एकल संक्रमणीय मतदान पद्धत
 • कलम ५६ : कार्यकाळ (साधारणत: ५ वर्षे परंतु, राजीनामा – उपराष्ट्रपतींकडे देऊ शकतात.)
 • कलम ५७ : कितीही वेळा पद धारण करू शकतात (डॉ. राजेंद्र प्रसाद)
 • कलम ५८ : पात्रता –

१) भारतीय नागरिक असावा.

२) वयाची ३५ वर्षे पूर्ण असावी.

३) कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे.

४) लोकसभा सदस्य होण्यास पात्र

 • कलम ५९ : शर्ती
 • कलम ६० : शपथ (सरन्यायाधीश/सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतम न्यायाधीश) 

संविधान व कायदा यांचे जतन, रक्षण व संरक्षण करण्याची तरतूद

 • कलम ६१ : महाभियोग – घटनाभंग या एकाच कारणावरून राष्ट्रपतीस पदावरून दूर करता येते. (१/४ सदस्यांची स्वाक्षरी असलेली लेखी नोटीस १४ दिवसांपूर्वी मांडावी लागते, दोन्ही सभागृहात एकूण सदस्यांच्या २/३ बहुमताने पारित होणे गरजेचे आहे, हा ठराव संसदेच्या कोणत्याही सभागृहात पहिल्यांदा मांडता येतो.)
 • कलम ७२ : क्षमादानाचा अधिकार
 • कलम १२३ : अध्यादेश काढण्याचा अधिकार

Contact Us

  Enquire Now