राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत
- राज्यातील शेकडो लोककलावंत, लोककलाकार, लोककला पथकांचे चालक गेली दीड वर्षे कोरोनामुळे आर्थिक संकटाला तोंड देत आहेत.
- त्यासाठी राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
- सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली व हा निर्णय घेण्यात आला.
- प्रति कलाकार 5 हजार रुपये देण्यात येणार असून जवळपास 22 कोटी रुपये खर्च होणार आहे.
- शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस अशा 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार आहे.