युवा (तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक) योजना – लेखकांच्या मार्गदर्शनासाठी (YUVA – “Young upcoming and Versatile Authors)

युवा (तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक) योजना – लेखकांच्या मार्गदर्शनासाठी (YUVA – “Young upcoming and Versatile Authors)

 • देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजवण्याच्या आणि जागतिक पातळीवर भारतीय लिखाणाचा ठसा उमटवण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘युवा’ योजनेचा प्रारंभ.
 • ३१ जानेवारी २०२१ रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांविषयी लढ्याशी संबंधित घटनांविषयी व त्यांच्या शौर्याच्या कथांविषयी लिहिण्याचे व त्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्याचे आवाहन केले होते.
 • युवा (यंग, अपकमिंग आणि वर्सेटाईल) ही योजना इंडिया @७५ (स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव) या प्रकल्पाचा भाग आहे.
 • शिक्षण मंत्रालयांतर्गत अंमलबजावणीची संस्था म्हणून नॅशनल बुक ट्रस्ट मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट माहितीसह टप्प्या-टप्प्याने ही योजना राबविली जाईल.
 • या योजनेंतर्गत तयार झालेल्या पुस्तकांचे नॅशनल बुक ट्रस्टकडून प्रकाशन होईल व इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतर करण्यात येईल, जेणेकरून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला चालना मिळेल.
 • निवड झालेल्या तरुण लेखकांना जगातील सर्वोत्तम लेखकांशी संवाद साधण्याचा, व साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल.
 • राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये तरुण विचारांचे सक्षमीकरण करणे आणि भावी जगात नेतृत्व करण्यासाठी सज्ज होणारे तरुण वाचक/अध्ययनकर्ते तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

युवा योजनेची वैशिष्ट्ये

 • संकल्पना – प्रशंसा न झालेले नायक, स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रीय चळवळ
 • १ जून ते ३१ जुलै २०२१ दरम्यान WWW.mygov,in/ च्या माध्यमातून अखिल भारतीय स्पर्धेतून ७५ लेखकांची निवड करण्यात येईल.
 • विजेत्यांची घोषणा १५ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात येईल व तरुण लेखकांना नामवंत लेखकांना प्रशिक्षण देण्यात येईल.
 • प्रकाशित पुस्तकांचे उद्‌घाटन १२ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी करण्यात येईल.
 • या योजनेंतर्गत प्रत्येक लेखकाला मासिक ५०००० रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.

कोरोनाकाळात कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी उपाययोजना

 • कोविडबाधित मुलांचे सक्षमीकरण, कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी भारत सरकारने पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेव्यतिरिक्त आणखी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
 • याद्वारे कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना निवृत्तीवेतन तसेच वाढीव आणि व्यापक विमा भरपाई देतील.

१) कर्मचारी राज्य विमा महामंडळ (इएसआयसी) अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन-रोजगाराशी संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी असलेल्या इएसआयसी निवृत्तीवेतन योजनेचा लाभ कोविडमुळे मरण पावलेल्यांनाही देण्यात येत आहे.

 • अशा व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना कर्मचाऱ्यांच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या ९०% इतका निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यास पात्र.
 • हा लाभ २३ मार्च २०२० पासून सर्व प्रकरणांसाठी २४ मार्च २०२२ पर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल.

२) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना-कर्मचाऱ्यांची “ठेवी संलग्न विमा योजना” (ईडीएलआय)

 • ईडीएलआय योजनेतील विमा लाभात वाढ करून त्याची व्याप्ती वाढवली.
 • हे विशेषत: कोविडमुळे आपला जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मदत करेल.
 • विम्याचा कमाल लाभ ६ लाख रुपयावरून ७ लाख रुपये करण्यात आला आहे.
 • २५ लाख रुपयांच्या किमान विमा लाभाची तरतुद पुनर्सचायित केली आणि १५ फेब्रुवारी २०२० पासून पुढील तीन वर्षासाठी लागु असेल.
 • कंत्राटी/हंगामी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यासाठी कायम नोकरीची अट शिथिल केली आहे, ज्याद्वारे १२ महिन्यांत नोकरी बदललेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यात आला आहे.
 • श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत या योजनेची मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहे.

Contact Us

  Enquire Now