मेघालयातील लुख नदीचे पुनरुज्जीवन
- दशकभरापूर्वी काेळसा खाणीतील सांडपाण्यामुळे मृतवत बनलेल्या लुख नदीच्या पुनरुज्जीवनास यश आल्याचा दावा मेघालय सरकारने केला आहे.
- शैवाळ आणि काही वनस्पतींच्या मदतीने फायटोरेमेडिएशन (Phytoremediation) या तंत्राने नदीला स्वच्छ बनविण्यात आले आहे.
लुख नदी
- इस्ट जैतिया हिल्स या मेघालयातील जिल्ह्यात उगम पावते.
- हा प्रदेश कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
- २०१२ मध्ये या नदीने प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठली होती. मेघालय प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी खाणींतील आम्लयुक्त सांडपाणी तसेच तत्सम प्रदूषकांना कारणीभूत धरले होते.
- मात्र स्वच्छता व शुद्धीकरण विषयक उपक्रमांमुळे या नदीला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात आले आहे.
- यामध्ये शैवाल आणि काही वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.