मुरा-द्रावा-डॅन्यूब जगातील पहिले ५ राष्ट्रीय जीवावरण क्षेत्र

मुरा-द्रावा-डॅन्यूब जगातील पहिले ५ राष्ट्रीय जीवावरण क्षेत्र

 • १५ सप्टेंबर २०२१ रोजी युनेस्कोने (UNESCO – United Nations Educational, Scientific and Cultural Organization) युरोपमधील मुरा-द्रावा-डॅन्यूब (Mura-Drava-Danube – MDD) या नदीतटीय संरंक्षित क्षेत्राला जीवावरण क्षेत्राचा दर्जा दिला.
 • ऑस्ट्रीय, स्लोव्हेनिआ, हंगेरी, क्रोटिया आणि सर्बिया या ५ देशांनी व्यापलेले हे क्षेत्र ‘युरोपचे ॲमेझॉन’ म्हणून ओळखले जाते.
 • ७०० किलोमीटर्सपेक्षा जास्त भागावर या जीवावरणाने क्षेत्र व्यापलेले असून त्यामध्ये मुरा-डावा-डॅन्यूब या तीन नद्यांच्या तटांवरील घनदाट जंगलांचा समावेश होतो.

जीवावरण क्षेत्र – (Biosphere Reserves)

 • या क्षेत्रांमध्ये जैवविविधता संर्वधनासह शाश्वत वापरावर भर देणाऱ्या उपाययोजनांचा समावेश केला जातो.
 • ही क्षेत्रे राष्ट्रीय सरकारांद्वारे नामांकित केले जातात आणि त्या देशांच्या सार्वभौम अधिकाराखाली येतात.

कोणतेही जीवावरण क्षेत्र ३ भागांत विभागले जाते.

 • अ) मुख्य क्षेत्र -(Core Zone) – काटेकोरपणे संरक्षित, फक्त संशोधनास परवानगी, मानवी वसाहतीस बंदी.
 • ब) बफर झोन – (Buffer Zone) – मुख्य क्षेत्र व सक्रमण क्षेत्र यादरम्यान संशोधन, मानवी वसाहत, पर्यटन यांना परवानगी.
 • क) संक्रमण क्षेत्र (Transition Zone) पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत मानवी क्रिया उदाहरणार्थ पशुपालन, वसाहत, संशोधन यांना परवानगी.
 • जगभरात युनेस्कोने १२४ देशांत ७०१ जीवावरण क्षेत्र घोषित केले आहे.

युनेस्को (UNESCO)

 • स्थापना – १६ नोव्हेंबर, १९४५
 • मुख्यालय – पॅरिस (फ्रान्स)
 • सदस्य – १९५
 • घोषवाक्य – पुरुष व महिलांच्या मनात शांततेची बांधणी
 • अग्रक्रम -(१) आफ्रिका (२) जेंडर समानता
 • १९७२ च्या जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाच्या संरक्षणार्थ करारानुसार वारसास्थळांची यादी प्रसिद्ध करते.

भारत आणि जीवावरण क्षेत्र

 • भारतात आतापर्यंत (ऑक्टोबर २०२१) एकूण १८ संरक्षित क्षेत्रांना जीवावरण म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे.
क्र नाव राज्य
निलगिरी तमिळनाडू, केरळ, कर्नाटक
नंदादेवी उत्तराखंड
मन्नारची खाडी तमिळनाडू
नोकरेक मेघालय
सुंदरबन पश्चिम बंगाल
मानस आसाम
सीमलीपाल ओडिसा
दिहांग-दिबांग अरुणाचलप्रदेश
पंचमढी मध्यप्रदेश
१० अचनकमार-अमरकंटक मध्यप्रदेश
११ कच्छचे आखात गुजरात
१२ थंड वाळवंट हिमाचल प्रदेश
१३ कांचनझोंगा सिक्कीम
१४ अगस्त्यमलाई केरळ, तमिळनाडू
१५ ग्रेट निकोबार अंदमान व निकोबार
१६ दिब्रू साईखोवा आसाम
१७ शेषाचलम आंध्रप्रदेश
१८ पन्ना मध्यप्रदेश

 

Contact Us

  Enquire Now