मिशन ऑक्सिजन स्वावलंबन
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजन वापरात आणि मागणीत मोठी वाढ झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशीव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. ऑक्सिजन निर्मिती करणारा हा पहिला साखर कारखाना ठरला असून दररोज सहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असून ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के आहे.