महाराष्ट्र पुरस्कार – २०२०

महाराष्ट्र पुरस्कार – २०२०

  • वर्ष २०२० साठीचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार, सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर, भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या “आशा भोसले” यांना देण्यात आला.

 

आशा भोसले

 

  • जन्म – ८ सप्टेंबर १९३३ (सांगली)
  • ओळख – सुप्रसिद्ध गायिका
  • गायनाची सुरुवात – ‘माझं बाळ’ या चित्रपटातून केली.
  • विशेष – ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका (१९९७)

 

कारकीर्द

 

  • आशाताई आजपर्यंत ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत.
  • आशाताईंनी गायनाची सुरुवात ‘माझं बाळ’ या चित्रपटातून केली.
  • १४ भाषांमध्ये १२००० हून अधिक गाणी गायली आहेत.
  • मराठी-हिंदी चित्रपट गीते, नाट्यगीते, उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, लावण्या, गझली, रॉक, पॉप आणि अन्य भाषातील गाणी गायली आहेत.
  • १९५० च्या सुमारास हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक गाणी गायली. पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत.

 

काही सुप्रसिद्ध गाणी

हिंदी

 

  • दिल क्या चीज है ——- (१९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार)
  • मेरा कुछ सामान —— (१९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार)
  • तनहा-तनहा यहाँ है जीना
  • जानम समझा करो
  • वो हसीन दर्द दे दो
  • पिया तू अब तो आ जा

 

मराठी

 

  • गंध फुलांचा गेला सांगून
  • ही वाट दूर जाते
  • तरुण आहे रात्र अजून
  • रेशमाच्या रेघांनी
  • केव्हा तरी पहाटे
  • एका तळ्यात होती

 

आशाताईंना मिळालेले अन्य पुरस्कार

 

  • १९८१ – सर्वोत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय पुरस्कार (दिल क्या चीज है, उमराव जान)
  • १९८६ – सर्वोत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय पुरस्कार (मेरा कुछ सामान, इजाज़.त)
  • १९८७ – नाईटिंगेल ऑफ आशिया ॲवॉर्ड
  • १९८९ – लता मंगेशकर पुरस्कार (मध्यप्रदेश सरकार)
  • १९९९ – लता मंगेशकर पुरस्कार (महाराष्ट्र सरकार)
  • २००० – दादासाहेब फाळके पुरस्कार
  • २००८ – पद्मविभूषण

महाराष्ट्रभूषण पुरस्काराविषयी

  • हा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च व मानाचा पुरस्कार
  • सुरुवात – १९९६
  • स्वरूप – रोख दहा लाख रुपये, प्रशस्तिपत्र
  • कोणाला – उद्योग, कला, आरोग्यसेवा, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला
  • २०१२ पर्यंत हा पुरस्कार फक्त महाराष्ट्रियन व्यक्तीलाच दिला जात असे, पण २०१२ पासून महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीयांनाही दिला जात आहे.

 

प्रथम विजेते – 

 

  • १९९६ – पु. ल. देशपांडे
  • २०१९ – राम सुतार
  • २०२० – आशा भोसले
  • २०१२, २०१३ व २०१४ या वर्षांमध्ये हा पुरस्कार कोणासही प्रदान करण्यात आला नाही.

Contact Us

    Enquire Now