मल्लखांबला ८५ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सादरीकरणाची संधी

मल्लखांबला ८५ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सादरीकरणाची संधी

 • जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या शतकी ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.
 • मल्लखांब या भारतीय क्रीडाप्रकाराला ८५ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सादरीकरणाची संधी मिळणार आहे.
 • १९३६ मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम संघाने मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर केली होती.
 • ऑलिम्पिक म्हणजे क्रीडा क्षेत्राचा दर चार वर्षांनी भरणारा कुंभमेळा
 • १९२० मध्ये सुरू झालेल्या ऑलिम्पिकने २०२० मध्ये शताब्दी पूर्ण केली.
 • १९३६ मध्ये मल्लखांब या अस्सल मराठमोळ्या भारतीय क्रीडा प्रकाराला संधी मिळाली होती. त्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशने अमरावतीमधील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा मल्लखांबपट्टुचा संघ पाठविला होता.
 • ३० जुलै आणि १ ऑगस्ट १९३६ मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिकच्या उद्‌घाटन सोहळ्यात डॉ. विश्वनाथ कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मल्लखांब पट्टुनी प्रात्यक्षिके सादर केली होती.
 • मल्लखांबसमवेत कबड्डी, पारंपारिक खेळ आणि कसरती यांची प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या या संघाचा जर्मनीचे चॅन्सलर ॲडाल्फ हिटलर यांनी प्रशस्तीपत्रक आणि सुवर्णपदक देऊन गौरव केला होता.
 • ऑलिम्पिकच्या शताब्दी वर्षामध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत हा कुंभमेळा भरणार आहे.

Contact Us

  Enquire Now