भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड
- विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांची १२ सप्टेंबर २०२१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
- भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचे मुख्यमंत्रीपद गेले आहे.
- ते कडवा पाटीदार समाजाचे नेतृत्व करतात.
- गुजरातचे राज्यपाल आचार्य देव्रत यांनी पटेल यांना गुजरातचे १७वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.
- भूपेंद्र पटेल यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
- राजकारणात पूर्णत: प्रवेश करण्याअगोदर ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण (एयूडीए)चे अध्यक्ष होते.
- घाटलोदिया विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच २०१७ मध्ये गुजरात विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले.
- १९९९-२००१ दरम्यान पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
- २००८-१० मध्ये अहमदाबाद नगरपालिका शालेय बोर्डाचे उपाध्यक्ष होते, तर २०१०-१५ दरम्यान अहमदाबादच्याच थालतेज प्रभागाचे कौन्सिलर म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला आहे.
- ते सरदारधाम विश्व पाटीदार केंद्राचे विश्वस्त व विश्व उमिया फाउंडेशनचे अध्यक्षही आहेत.
- दादा भगवान यांनी स्थापन केलेल्या अक्रम विज्ञान चळवळीचे ते अनुयायी आहेत.