भारत, इंग्लंड कोविड-१९ अभ्यासगटाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
- ‘एकाच शैक्षणिक प्रबंधासाठी सर्वाधिक लेखकांचा सहभाग’ यासाठी भारत, इंग्लंड कोविड-१९ अभ्यासगटाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
- इंग्लंडमधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर अभ्यास करण्यात आला.
- यामध्ये जगभरातील तब्बल १५०२५ वैज्ञानिकांनी सहभाग नोंदविला.
- कोविड-१९ चा सर्जिकल रुग्णांवर होणारा परिणाम या अभ्यासमोहिमेद्वारे तपासण्यात आला.
- या संशोधनातून शस्त्रक्रियेची वाट पाहणाऱ्या रुग्णांना असुरक्षित गट असे ग्राह्य धरून त्यांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी, ज्यायोगे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर कोविडमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या कमी होतील व पर्यायात मृत्यूसंख्या कमी होईल.