भारतीय रिझर्व्ह बँकेचा मौद्रिक धोरण अहवाल

भारतीय रिझर्व्ह बँकेचा मौद्रिक धोरण अहवाल

 • भारतीय रिझर्व्ह बँकेने कायमस्वरूपी पुनर्प्राप्ती होईपर्यंत सलग आठव्यांदा पॉलिसी दर अपरिवर्तित ठेवत ऑक्टोबर २०२१ साठी चलनविषयक धोरण अहवाल जारी केला आहे.

आरबीआयचे अपरिवर्तित पॉलीसी दर

अ) रेपोदर – ४%

ब) रिव्हर्स रेपोदर – ३.३५%

क) सिमांतिक राखीव सुविधा (MSF) – ४.२५%

ड) बँक दर – ४.२५%

  • जीडीपी अंदाज: २०२१-२२ साठी सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढ (GDP) ९.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आली आहे.
  • महागाई: आरबीआयने ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (CPI) चलनवाढीचा अंदाज ऑगस्ट २००५ मधील ५.७ टक्क्यांवरून ५.३ टक्के केला आहे.

शासकीय प्रतिभूती अधिग्रहण कार्यक्रम (GSAP)

 • सरकारी कर्ज व वस्तू आणि सेवा कर भरपाईसाठी जास्त कर्ज न घेतल्यामुळे वाढलेली तरलता दाखवून जीएसएपी बंद करण्यात आले आहे.
 • जीएसएपी बंद केल्यानंतरही आरबीआयने आश्वासन दिले आहे की, ते ऑपरेशन ट्‌विस्ट (ओटी) आणि नियमित खुल्या बाजारातील व्यवहार यासह तरलता व्यवस्थापनाशी संबंधित इतर कार्ये लवचिकपणे सुरू ठेवेल.
 • ऑपरेशन ट्‌विस्ट : रिझर्व्ह बँक अल्पकालीन रोखे विक्रीतून मिळणारी रक्कम दीर्घकालीन कर्ज साधने खरेदी करण्यासाठी वापरते, ज्यामुळे दीर्घकालीन साधनांवरील व्याजदराचा भार कमी होतो.
 • जास्तीची तरलता शोधून घेण्यासाठी ऑगस्ट २०२१ ला आरबीआयने व्हेरिएबल रिव्हर्स रेपो रेट (व्हीआरआरआर) सुरू केला, ज्याचा मुख्य उद्देश रिव्हर्स रेपोच्या निश्चित दरापेक्षा जास्त उत्पन्न मिळविणे हा आहे.
 • व्हीआरआरआर लिलावाचा आकारही डिसेंबर २०२१ सुरुवातीपर्यंत ६ ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

आरबीआयचे मौद्रिक धोरण

 • आर्थिक विकास व किंमती स्थिर राखण्यासाठी मध्यवर्ती बँक ज्या धोरणान्वये बाजारातील पैशाचा पुरवठा पतनिर्मिती, पैशाचे मूल्य आदींचे नियंत्रण व नियमन करते, त्या धोरणाला चलनविषयक किंवा मौद्रिक धोरण म्हणतात.
 • उद्दिष्ट – ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ लक्षात घेऊन किंमती स्थिर राखणे.

Contact Us

  Enquire Now