भारतीय गेंडा व्हिजन २०२०
- भारतीय गेंडा व्हिजन २०२० हा भारतातील आसाम राज्यातील सात संरक्षित भागात पसरलेल्या किमान ३००० पेक्षा जास्त एकशिंगी गेंड्यांची वनसंख्या मिळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न होता.
- आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, पोबीटोरा राष्ट्रीय उद्यान, औरंग राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, लाओखोवा वन्यजीव अभयारण्य, बुरचा पोरी वन्यजीव अभयारण्य आणि डिब्रू सैखोवा वन्यजीव अभयारण्य अशी सात संरक्षित क्षेत्रे आहेत.
ठळक मुद्दे
- अलिकडेच, भारतीय गेंडा व्हिजन २०२० (IRV २०२०) अंतर्गत दोन प्रौढ एकशिंगी गेंडे पोबिटोरा वन्यजीव राखीव अभयारण्यातून मानस राष्ट्रीय उद्यानात स्थानांतरित करण्यात आले.
- आयआरव्ही २०२० अंतर्गत गेंडा लिप्यंतरणाची (Translocation) ही आठवी फेरी होती.
- आयआरव्ही २०२० अंतर्गत वन्य ते जंगली स्थानांतरणाच्या या शेवटच्या टप्प्यात, पोबीटोरा वन्यजीव राखीव अभयारण्यातून (१२) आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून (१०) असे एकूण २२ एकशिंगी गेंडे मानस राष्ट्रीय उद्यानात स्थानांतरित करण्यात आले.
- काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून मानस राष्ट्रीय उद्यानासारख्या अधिक गेंड्यांची गरज असलेल्या भागात हे स्थानांतरण करण्यात आले.
भारतीय गेंडा व्हिजन २०२० (IRV २०२०) बद्दल
- २००५ मध्ये ही मोहीम प्रथमत: सुरू केली गेली
- IRV २०२० हा डब्लूडब्लूएफ इंडिया, आंतरराष्ट्रीय गेंडा संवर्धन आणि संरक्षण संघटना आणि इतर अनेक संस्थांच्या सहकार्याने आसाम सरकारच्या वनविभागाच्या पुढाकाराने स्थापन केलेला प्रकल्प आहे.
- आयआरव्ही २०२० चे लक्ष्य आसाममधील नवीन संरक्षित क्षेत्रात गेंड्यांची संख्या ३००० पर्यंत वाढविणे हे होते.
- आसाममधील चार संरक्षित भागात प्रामुख्याने एकशिंगी गेंडे आढळतात. पाबीटोरा वन्यजीव राखीव अभयारण्य, राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस राष्ट्रीय उद्यान
आयआरव्ही २०२० कार्यक्रमाची आत्तापर्यंतची कामगिरी
- आयआरव्ही २०२० अंतर्गत ३००० गेंड्यांची संख्या गाठण्याचे लक्ष जवळजवळ साध्य झाले परंतु नियोजित चार संरक्षित क्षेत्रांपैकी केवळ एकाच ठिकाणी गेंड्यांचे पुनरुत्पादन होऊ शकेल.
- चार संरक्षित राखीव क्षेत्रे सोडून इतर भागात एकशिंगी असलेला गेंडा पसरविण्याची योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
- २०२१ मध्ये स्थानांतरित केलेल्या गेंड्यामुळे मानस राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा परत मिळविण्यास मदत झाली.
संरक्षण स्थिती
- आययूसी टान लाल यादी – असुरक्षित गटात
- वन्यप्राण्यांच्या धोकादायक प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील परिषद (CITES) मधील परिशिष्ट-I अंतर्गत सूचीबद्ध.
- वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या अनुसूची I अंतर्गत एकशिंगी गेंडा सूचीबद्ध आहे.
एक शिंगी (Greater One – Horned) गेंड्याबद्दल
- जगात एकशिंगी गेंडा केवळ भारतातच आढळतो.
- याला भारतीय गेंडा म्हणून देखील ओळखले जाते, ही गेंडा प्रजातींपैकी सर्वात मोठी प्रजाती आहे.
- याच्यावर असलेल्या एक शिंगामुळे आणि त्वचेवर असलेल्या राखाडी तपकिरी पट्ट्यावरून यांची ओळख होते.
- ते प्रामुख्याने गवत चरतात. तर पाने, झुडपे, झाडांच्या फांद्या, फळ आणि जलीय वनस्पती असा त्यांचा आहार असतो.
आढळ :
- प्रजाती भारत – नेपाळ तेराई आणि उत्तर पश्चिम बंगाल आणि आसाममधील छोट्या वस्त्यांपर्यंतच प्रतिबंधित आहेत.
- भारतात एकशिंगी गेंडा मुख्यत: काझीरंगा, पोबिटोरा, ओरंग, मानस, जलद पारा राष्ट्रीय उद्यान या आसाममधील तर गोरुमारा राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल येथे आढळतो.
भारतातील गेंडा संवर्धनाचे इतर प्रयत्न :
- गेंड्याचा आढळ असलेल्या पाच देशांपैकी (भारत, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया आणि मलेशिया) या देशांनी गेंड्यांच्या प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षणासाठी असलेल्या ‘आशियाई गेंडा २०१९ नवी दिल्ली घोषणा’ या जाहीरनाम्यावर सही केली आहे.
- पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने देशातील सर्व गेंड्यांची डीएनए प्रोफाईल तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.
- मोठे एकशिंग असलेल्या गेंड्यांचे संवर्धन तसेच संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय गेंडा संवर्धन हे २०१९ मध्ये सुरू करण्यात आले होते.