भारतात यूएनजीडब्ल्यूआयसीची दुसरी बैठक
- संयुक्त राष्ट्राच्या जागतिक भौगोलिक माहिती काँग्रेसची (यूएनजीडब्ल्यूआयसी) दुसरी बैठक ऑक्टोबर २०२२ मध्ये हैदराबाद येथे पार पडणार आहे.
- ‘आजादी का अमृतमहोत्सव’ चा भाग म्हणून भारतात याचे आयोजन केले जात आहे.
- या कार्यक्रमात भारतात विकसित होत असलेल्या भू-स्थानिक परिसंस्थांची झलक बघायला मिळेल.
- संयुक्त राष्ट्राच्या जागतिक भौगोलिक माहिती काँग्रेसची (United Nation World Geospatial Information Congress- UN-WGIC):
- आयोजन: संयुक्त राष्ट्र ग्लोबल जिओ-स्पॅशियल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट वरील तज्ज्ञांची समिती
- दर चार वर्षांनी ही बैठक आयोजित केली जाते.
- पहिली बैठक: ऑक्टोबर २०१८ (चीन)
उद्देश: सदस्य देश आणि भौगोलिक माहिती व्यवस्थापन आणि क्षमतांमध्ये संबोधित भागधारकांत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे.
२०२२ ची थीम:
- ‘Towards Geo-enabling the global village’
जिओ-स्पॅशियल डेटा म्हणजे काय?
- यालाच जिओ-डेटा असेही म्हटले जाते. यात स्थानासंबंधित माहिती दिलेली असते, ज्यात पत्ता क्षेत्र किंवा झिप (झोन सुधारित आराखडा) कोड या डेटासेटशी जोडलेला असतो.
भू-स्थानिक तंत्रज्ञान:
या तंत्रज्ञानाने अंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो-
1. रिमोट सेन्सिंग
2. भौगोलिक माहिती प्रणाली
3. ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम
4. थ्रीडी स्कॅनिंग
भारताचे भू-स्थानिक धोरण:
1. स्वामित्व योजना: ग्रामीण लोकसंख्या सशक्त करण्यासाठीची ही योजना असून याअंतर्गत ग्रामीण जमीन धारकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाते.
2. सारथी
3. ऑनलाईन मॅप्स (नकाशा) पोर्टल
4. मंचित्रण(Mannchitran): नॅशनल ॲटलास अॅण्ड थिमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन (NATMO) ने या पोर्टल वर भारताचे सांस्कृतिक, आर्थिक व प्राकृतिक नकाशे प्रसिद्ध केले आहेत.
5. भुवन पोर्टल (इस्रो).