भारतात मर्यादित आपत्कालीन वापरासाठी ‘मॉडर्ना’ला मान्यता
- भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डिसीजीआय) अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.
- या लसीच्या आयातीसाठी मॉडर्नाची भारतातील भागीदार औषध कंपनी ‘सिप्ला’स डिसीजीआयने परवानगी दिली आहे.
- कोव्हॅक्सच्या माध्यमातून मॉडर्ना तसेच mRNA- १२७३ च्या काही लसमात्रा भारताला देणगी स्वरूपात पुरवण्यास अमेरिकन सरकारने मान्यता दिली आहे.
उद्देश :
अ) देशाच्या लसीकरण मोहिमेला बळ देणे.
ब) देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण लसीकरणासाठी वेगवान लससाठा उपलब्ध करणे.
वापर कधी?
- सिप्लाद्वारे प्रथम १०० लसलाभार्थ्यांचे आठवड्याभराचे सुरक्षा मूल्यमापन केल्यानंतरच लसीकरण मोहिमेत या लसीचा वापर करण्यात येईल.
तपासणी : केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कसौली (हिमाचल प्रदेश)
मॉडर्नाची वैशिष्ट्ये :
अ) साठवण :
i) ७ महिन्यांपर्यंत (-)२५ अंश ते (-)१५ अंश सेल्सिअस तापमान
ii) ३० दिवसांसाठी २ अंश ते ८ अंश सेल्सिअस तापमान
ब) दुसरी मात्रा : २८ दिवसांनंतर
भारतातील उपलब्ध इतर कोरोना प्रतिबंधक लसी व त्यांची परिणामकारकता
क्र. | कोरोना प्रतिबंधक लस | परिणामकारकता |
१) | कोविशील्ड | ७४% |
२) | कोव्हॅक्सिन | ७७.८% |
३) | स्पुटनिक | ९१% |
४) | मॉडर्ना | ९४% |