भारतात आढळलेल्या कोरोना उपप्रकारांचे कप्पा आणि डेल्टा असे नामकरण

भारतात आढळलेल्या कोरोना उपप्रकारांचे कप्पा आणि डेल्टा असे नामकरण 

 • भारतात सर्वप्रथम बी 1.617.1 आणि बी 1.617.2 या दोन विषाणू प्रकारांना अनुक्रमे कप्पा आणि डेल्टा अशी नावे देण्यात आली आहेत.
 • या विषाणू प्रकाराचे शास्त्रीय नाव लक्षात ठेवण्यास व वापरण्यास अवघड असल्यामुळे भारतीय माध्यमांनी यास भारतीय उपप्रकार असे संबोधण्यास सुरुवात केली.
 • यामुळे भारताने नाराजी व्यक्त केल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या SAARS COV-2 विषाणूच्या उपप्रकारांचे नाव ग्रीक वर्णमालेतील दहावे अक्षर म्हणजे कप्पा आणि चौथे अक्षर म्हणजे डेल्टा यानुसार दिली आहेत.
 • मात्र त्यांच्या शास्त्रीय नावात महत्त्वाची शास्त्रीय माहिती असल्यामुळे या नवीन नावांचा वापर संशोधनात करता येणार नाही.
 • तसेच यामुळे देशाच्या नावावरून विषाणूंना ओळखले जाण्याचा अवमानास्पद प्रकारही टाळला जाणार आहे.

कोव्ह – 19 चे उपप्रकार व नवीन नावे

क्र. शास्त्रीय नाव प्रथम आढळण्याचे ठिकाण नवे नाव पहिल्यांदा आढळ
1 बी 1.1.7 ब्रिटन अल्फा 12 डिसेंबर 2020
2 बी 1.351 दक्षिण आफ्रिका बीटा 18 डिसेंबर 2020
3 पी1 ब्राझील गॅमा 11 जानेवारी 2021
4 बी 1.427 अमेरिका एप्सिलॉन 5 मार्च 2021
5 पी 2 ब्राझील झेटा 17 मार्च 2021
6 बी 1.526 अमेरिका आयोटा 24 मार्च 2021
7 बी 1.617.1 भारत कप्पा 4 एप्रिल 2021
8 बी 1.617.2 भारत डेल्टा 4 एप्रिल 2021 (VOI)

11 मे 2021 (VOC)

VOI – Variant of Interest, VOC – Varian of Concern

VOC- उदा. बी 1.1.7., बी 1.351, पी 1

 • प्रसार अगदी सहज होतो.
 • गंभीर आजारी पडणे.
 • प्रतिपिंडे (ॲण्टीबॉडीज्‌) लस तसेच उपचारांचा काहीही परिणाम होत नाही. 

VOI – रिसेप्टर बाइंडिंगशी संबंधित विशिष्ट जेनेटिक मार्कर असलेला प्रकार.

 • उदा. बी 1.617.1

व्हॅरिएण्टसची निर्मिती :

 • विषाणूच्या रुपांमध्ये एक किंवा अधिक उत्परिवर्तन (mutation) होऊन व्हेरिएण्टस्ची निर्मिती होते. जे एकमेकांपासून भिन्न असतात.

उत्परिवर्तन म्हणजे काय?

 • सजीवांच्या पेशीतील जनुक तसेच गुणसूत्रांमध्ये घडून आलेला बदल म्हणजे उत्परिवर्तन.

बी 1.617 : दुहेरी परिवर्तन

 • E 484 आणि L452R यांच्या उत्परिवर्तनामुळे बी 1.617 ची उत्पत्ती.
 • भारतात 70% तर ब्रिटनमध्ये 23%, सिंगापूर 2%, ऑस्ट्रेलिया 1%, जनुके ही बी 1.617 उत्परिवर्तनाशी संबंधित आहेत.

व्हायरसचे नाव कसे दिले जाते?

 • रोगनिदानविषयक चाचण्या, लस आणि औषधे विकसित करण्यासाठी व्हायरसचे नाव हे त्यांच्या आनुवंशिक संरचनेच्या आधारे दिले जाते.
 • इंटरनॅशनल कमिटी ऑन टॅक्सोनॉमी ऑफ व्हायरस (आयसीटीव्ही) ही यासाठी जबाबदार आहे.

Contact Us

  Enquire Now