भारताच्या खेळणी उद्योगात महिलांची भूमिका

भारताच्या खेळणी उद्योगात महिलांची भूमिका :

  • राष्ट्रीय उत्पादकता परिषदेच्या अहवालानुसार, ३ दशलक्ष लोक खेळणी उद्योगात कार्यरत असून ५००० हून अधिक एमएसएमई युनिट या उद्योगांत गुंतले आहेत व महत्त्वाचे म्हणजे ७० टक्के महिला या उद्योगात कार्यरत आहेत.
  • श्रम केंद्रित स्वभाव लक्षात घेता हा उद्योग महिला कामगारांचा प्रमुख नियोक्ता म्हणून उदयास आला आहे.
  • जानेवारी २०२१ मध्ये विद्यार्थी, शिक्षक, तज्ज्ञ, स्टार्टअप्सना भारतीय संस्कृतीवर आधारित खेळणी विकसित करण्यासाठी टॉयकॅथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
  • नुकतेच कर्नाटकमधील कोप्पल जिल्हा देशातील पहिले खेळणी क्लस्टर म्हणून उदयास आले आहे.

ड) एमएसएमई – महिला

 

  • एमएसएमईमधील बदल:
प्रकार गुंतवणूक उलाढाल
सूक्ष्म < १ कोटी < ५ कोटी
लघु १० कोटी ५० कोटी
मध्यम ५० कोटी २५० कोटी
  • यात महिला विविध भूमिका पार पाडतात, जसे- कर्मचारी, निर्णयक्षमता, व्यवस्थापकीय पद, उद्योग प्रमुखांचा महिला कर्मचाऱ्यांप्रती अभिप्राय, महिला कर्मचाऱ्यांद्वारा प्राप्त उत्पादकता, सामाजिक-आर्थिक स्थिती इ.
  • जागतिक महिला दिनानिमित्त भारत सरकारने ८ मार्च २०१८ रोजी महिला उद्योजकता व्यासपीठ (WEP) सुरू केले आहे. हा निती आयोगाचा प्रमुख उपक्रम आहे.

Contact Us

    Enquire Now