भारताचा पहिला स्वदेशी तापमान डेटा लॉगर – ॲम्बी टॅग (Ambi-Tag)
- आयआयटी, रोपार (पंजाब) द्वारा कोल्ड चेन व्यवस्थापनासाठीचा भारतातील पहिला स्वदेशी तापमान डेटा लॉगर – ‘ॲम्बी टॅग’ विकसित केला आहे.
ॲम्बी टॅगविषयी थोडक्यात :
- हा यूएसबी डिव्हाइसच्या आकाराचा असून त्याच्या आसपासच्या तापमानाचे ९० दिवसांसाठी -४० ते ८० अंश सेल्सियसपर्यंतचे तापमान सतत नोंदवत असते.
- हे प्रथम प्रकारचे इनोव्हेशन अर्थात AWaDH (कृषी, जलतंत्रज्ञान विकास हब) आणि त्याचे स्टार्टअप स्क्रॅचनेस्ट अंतर्गत विकसित केले आहे.
लॉगरचे महत्त्व
- लॉगरमुळे रेकॉर्ड केलेले तापमान जे तापमानातील भिन्नतेमुळे जगातील कोठूनही वाहतूक केलेली विशिष्ट वस्तू अद्याप वापरण्यायोग्य आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत करेल.
- या उपकरणामुळे कोविड-१९ ची लस वाहतुकीत सामिल सर्व कंपन्यांना उत्पादन सुविधेपासून देशातील शेवटच्या मैलावरील लसीकरण केंद्रापर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल.
उपयोग :
- भाजीपाला, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांसह नाशवंत वस्तूंशिवाय जनावरांच्या वीर्याच्या तापमानावरही नजर ठेवू शकते.
- ॲम्बीटॅगमुळे कोविड-१९ लस, अवयव आणि रक्त वाहतुकीसाठी उपयुक्त माहिती
AWaDH :
- आयआयटी, रोपर येथील संशोधन केंद्र
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या सहाय्याने स्थापना
- कृषी आणि पाण्याचे विस्तृत संशोधन