बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मार्गदर्शक भारद्वाज यांचे निधन
- यशस्वी खेळाडू, उत्तम प्रशिक्षक व कुशल संघटक असलेले भारतीय बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कारविजेते ओ. पी. भारद्वाज यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. दहा दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी संतोष यांचे निधन झाले होते.
- त्यांनी खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली, तसेच निवडकर्ते आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी नव्या पिढीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. भारद्वाज यांनी पतियाळातील एनआयएस केंद्रातील डिप्लोमा कोचिंग कोर्समध्ये पहिले मुख्य निरीक्षक म्हणून सिंहाचा वाटा उचलला.
- पुण्यातील आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंगमध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली होती. 2004 मध्ये भारद्वाज यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाही बॉक्सिंगचे धडे दिले.
- भारद्वाज 1968 ते 1989 दरम्यान भारतीय बॉक्सिंग संघाचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशियाई, राष्ट्रकुल, दक्षिण आशियाई स्पर्धेत अनेक पदके जिंकली आहेत.
- क्रीडा मार्गदर्शकांसाठी 1985 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. त्या वर्षी ओ. पी. भारद्वाज यांच्या समवेत भालचंद्र भास्कर भागवत (कुस्ती), ओ. एम. नंबियार (ॲथलेटिक्स) यांनाही गौरविण्यात आले होते.
- भारद्वाज कायम भविष्याचा विचार करीत असत. ‘डायनॅमिक मॅन’ ही भारद्वाज यांची खास ओळख होती.
- एकदा रशिया दौऱ्यावरून परत येत असताना त्यांनी भारतात टाईपराईटर आणला. ही संकल्पनाच नवीन असल्याने टायपिंग येण्याचा प्रश्नच नव्हता. पण जिद्दीने भारद्वाज केवळ एका बोटाने टायपिंग करायचे.
- एनआयएसमध्ये बॉक्सरसाठी ज्या सुविधा आवश्यक आहेत, त्यांची मागणी या टाइपरायटरवर टाईप करून ते वरिष्ठांना कळवत, अशी आठवण गुप्ता यांनी सांगितली.
द्रोणाचार्य पुरस्कार थोडक्यात :
- सुरुवात – 1985. (भारतीय क्रीडा प्रशिक्षकांसाठी)
- भारत सरकारद्वारे(नागरी पुरस्कार).
- प्रथम विजेते – भारद्वाज (बॉक्सिंग), भागवत (कुस्ती), नंबियार (ॲथलेटिक्स).
2020 चे विजेते :
- योगेश मालवीय (मल्लखांब)
- जसपाल राणा (शूटिंग)
- जुडे सेबस्तिअन (हॉकी)
- गौरव खन्ना (बॅडमिंटन)
- कुलदीप कुमार हांडू (वुशू)