बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
- ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी खासदार संभाजीराव उर्फ लालासाहेब काकडे यांचे वृद्धापकाळाने (वय ८९) पुण्यात निधन झाले.
- ते बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले होते.
- संभाजीराव काकडे हे जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्यासोबत देशातील समाजवादी चळवळीत होते.
- माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर हे त्यांचे जवळचे मित्र, तर मोरारजी देसाई यांचे ते मानसपुत्र होते.
- १९८२ मध्ये संभाजीराव काकडे यांनी ‘नांगरधारी शेतकरी’ हे चिन्ह घेऊन माजी खासदार शंकरराव पाटील यांचा धक्कादायक पराभव केला होता.
- खेड मतदारसंघातून खासदारकीच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
- शेवटपर्यंत ते समाजवादी धोरणांशी बांधिल राहिले होते.