फुम्झिले म्लाम्बो एनगकुका – ग्लोबल गोलकीपर्स पुरस्काराने सन्मानित

फुम्झिले म्लाम्बो एनगकुका – ग्लोबल गोलकीपर्स पुरस्काराने सन्मानित 

 • लैंगिक समानतेसाठी लढा दिल्याबद्दल तसेच कोविड-19 काळात महिला आणि मुलींविरोधात होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काम करणाऱ्या फुम्झिले म्लाम्बो एनगकुका (Phumzile Mlambo-Ngcuko) यांना ‘बिल ॲण्ड मिलिंडा गेट्‌स्‌ फाउंडेशन’च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल गोलकीपर्स 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेला गती देण्याच्या कार्याचा सन्मान तसेच तरुणांना प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 
 • भारतामध्ये स्वच्छता अभिमान यशस्वीपणे राबविल्याबद्दल 2019चा गोलकीपर्स पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता.
 • या व्यतिरिक्त 3 अन्य विभागात पुरस्कार देण्यात आले आहेत.

फुम्झिले म्लाम्बो एनगकुका

 • जन्म : 3 नोव्हेंबर 1955, दक्षिण आफ्रिका

कारकीर्द 

 • 2005 ते 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती 
 • 2013 साली संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सर्वोच्चपदी अर्थात अव्वर सचिव म्हणून नियुक्ती.
 • 2013 पासूनच UN women च्या कार्यकारी संचालक.

इतर विभाग 

 

 • प्रगती  पुरस्कार 2021 (Progress Award 2021)

 

 • जेनिफर कोलपास (कोलंबिया)
 • स्वच्छ ऊर्जा, सुरक्षित पाणी तसेच स्वच्छता क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

 

 • चेंज मेकर पुरस्कार 2021

 

 • फिरोझ फैझाह बिथर (Fairooz Faizah Beether) बांगलादेश
 • मानसिक आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
 • 2019 साली भारताची 17 वर्षीय युवती पायल जांगीड यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजस्थानातील बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

 • कॅम्पेन पुरस्कार 2021 (Campaign Award 2021)

 

 • सत्ता शेरिफ (Satta Sheriff) लायबेरिया
 • बालविवाह तसेच लैंगिक अत्याचारांच्या विरोधात केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

 

 • बिल आणि मिलिंडा गेट्‌स्‌ फाउंडेशन

 

 • स्थापना 2000
 • संस्थापक – बिल गेट्‌स्‌, मिलिंडा गेट्‌स्‌
 • मुख्यालय – सियाटेल, अमेरिका
 • कार्यक्षेत्र – जगभर

Contact Us

  Enquire Now