पूर्व आर्थिक मंच, 2021
- रशियाच्या व्लादिवोस्ताक येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी सहाव्या पूर्व आर्थिक मंचाची (ईस्टर्न इकाेनॉमिक फोरम – ईईएफ) शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
- या प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.
- 2019 मध्ये पार पडलेल्या ईईएफच्या शिखर परिषदेस ते प्रमुख अतिथी म्हणून हजर होते व या बैठकीस हजर राहणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान होते.
याप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
- रशियाच्या सुदूर पूर्वेच्या विकासासाठी अध्यक्ष पुतीन यांची प्रशंसा करत रशियाचा विश्वासार्ह भागीदार असण्याच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा’ भाग म्हणून भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
- विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंच्या अधिकाधिक आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीच्या महत्त्वावर भर दिला.
- आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्रास कोरोना महामारी काळात उदयास आलेले सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र म्हणून अधोरेखित केले.
- त्याचबरोबरच हिरे, कोळसा, स्टील, लाकूड, इत्यादींसह आर्थिक सहकार्याच्या इतर संभाव्य क्षेत्रांचाही उल्लेख केला.
पूर्व आर्थिक मंच (Eastern Economic Forum) :
- 2015 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाने या मंचाची स्थापना झाली.
- दरवर्षी रशियातील सुदूर पूर्वेच्या आर्थिक विकासास चालना देणे तसेच आशिया – पॅसिफिक प्रदेशात आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विस्तार करणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे.
- जागतिक अर्थव्यवस्था, प्रादेशिक एकत्रीकरण, नवीन औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रांचा विकास तसेच रशिया आणि इतर राष्ट्रांसमोरील जागतिक आव्हाने अशा महत्त्वाच्या मुद्द्यांच्या चर्चेसाठी मुख्य व्यासपीठ म्हणून कार्य करते.
- वर्षानुवर्षे, रशिया आणि आशिया पॅसिफिक दरम्यान राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध विकसित करण्यासाठी हे धोरण चर्चेसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.
सुदूर पूर्व काय आहे?
- हा रशियाचा अति पूर्वेकडील भाग.
- रशियाचा एक तृतीयांशपेक्षा अधिक क्षेत्र सुदूर पूर्व भागाने व्यापले आहे.
- या क्षेत्रास दोन महासागर (प्रशांत व आर्क्टिक महासागर) आणि पाच देशांच्या (चीन, मंगोलिया, जपान, अमेरिका, कोरिया) सीमा लागून आहेत.
- रशियाच्या एकूण वनक्षेत्राच्या 30 टक्के जंगल या भागात आहेत.
- देशाच्या एक तृतीयांश कोळशाचे साठे व जल – अभियांत्रिकी संसाधने येथे आढळतात.
- हा प्रदेश हिरे, बोरॅक्स सामग्री, टंग्स्टन, सोने, मासे, सीफूड यांसारख्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे.
रशिया आणि भारत संबंध :
- चेन्नई बंदराला रशियन सुदूर पूर्वेतील व्लादिवोस्ताकशी जोडण्याची योजना आहे; यामुळे सुएझ कालव्याच्या संदर्भात भारत आणि रशियास पर्यायी सागरी मार्ग उपलब्ध होईल; तसेच चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ उपक्रमासाठी योग्य काउंटर असू शकते.
आर्थिक वाटाघाटींची उदयोन्मुख क्षेत्रे :
- शस्त्रास्त्रे, हायड्रोकार्बन, अणुऊर्जा (कुडनकुलम), अंतराळ (गगनयान) आणि हिरे यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्त खाणी, कृषी-औद्योगिक आणि उच्च तंत्रज्ञान ज्याअंतर्गत रोबॉटिक्स, नॅनोटेक, बायोटेक यांसारखी आर्थिक गुंतवणुकीची नवीन क्षेत्रे उदयास येण्याची शक्यता आहे.
बहुपक्षीय मंचांवर समर्थन :
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आण्विक पुरवठादार गटाच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशिया भारताच्या उमेदवारीला समर्थन देतो.
संरक्षण सहकार्य :
- भारत संरक्षण साहित्यापैकी 60 ते 70 टक्के आयात रशियाकडून करतो. उदा. ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली, SU-30 विमाने, T-90 टँक.
- इंद्र सराव : भारत-रशिया (लष्कर, नौदल, वायूसेना)