पी. बी. सावंत
जन्म – 30 जून 1930
निधन – 15 फेब्रुवारी 2021
शिक्षण – एल. एल. बी मुंबई विद्यापीठ
कारकीर्द :
– 1973 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
– 1989 ते 1995, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती
– 1995 मध्ये निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग
– प्रेस कौन्सिल आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला
– पुण्यातील पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष
– मराठा आरक्षणासंबंधित नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे अध्यक्ष
– गोध्रा प्रकरणासंबंधातील त्रिसदस्यीय लवादाचे सदस्य
– इंदिरा सहानी खटल्यात मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण लागू करण्यात आले होते; त्या खंडपीठाचे सदस्य होते
– 1999 साली राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले
– पी. बी. सावंत अध्यक्षतेखालील आयोग:
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणे
पुस्तके :
अ ) A Grammar of Democracy (2013)
ब ) Advertising Law and Ethics (2002)
क ) Mass Media in Contemporary Society (1998)