‘पीएम दक्ष’ पोर्टल आणि ‘पीएम-दक्ष’ मोबाईल ॲप

‘पीएम दक्ष’ पोर्टल आणि ‘पीएम-दक्ष’ मोबाईल ॲप

 • सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ‘पीएम दक्ष’ पोर्टल आणि ‘पीएम-दक्ष मोबाईल ॲपचे नवी दिल्लीत उद्‌घाटन केले.
 • यामुळे लक्ष्यित गटातील युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती सहजरीत्या उपलब्ध होऊ शकेल.

पीएम-दक्ष योजना:

 • अंमलबजावणी : २०२०-२१
 • लाभ : या योजनेअंतर्गत पात्र लक्ष्य गटांना पुढील लाभ प्राप्त होतील:

अ) कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

ब) कौशल्य सुधारणा

क) अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम

ड) दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम

इ) उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी)

  • हे प्रशिक्षण कार्यक्रम शासकीय प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्थापन केलेल्या क्षेत्र कौशल्य परिषद आणि इतर विश्वासार्ह संस्थांच्या माध्यमातून राबविले जात आहे.
 • पात्रता:
  • अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विकृत जमाती, कचरा उचलणाऱ्यांसह सफाई कामगार, ट्रान्सजेंडर्स, आणि यासारखेच इतर.

याची अंमलबजावणी करणारे मंत्रालयांतर्गत तीन महामंडळे:

अ) राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (NSFDC)

ब) राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (NBCFDC)

क) राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC)

लक्ष्यित गटांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाची सद्यस्थिती:

अ) उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात लक्ष्यीत गटांपैकी २,७३,१५२ लोकांना आतापर्यंत कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ब) २०२१-२२ या वर्षात सुमारे ५०,००० लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.

योजनेचे महत्त्व:

 • लक्ष्य गटातील बहुतेक व्यक्तींकडे किमान आर्थिक मालमत्ता आहे म्हणून या उपेक्षित लक्ष्य गटांच्या आर्थिक सक्षमीकरण/उन्नतीसाठी प्रशिक्षणाची तरतूद आणि त्यांची क्षमता वाढवणे आवश्यक आहे.
 • लक्ष्य गटातील बहुतेक लोक ग्रामीण कारागीर या श्रेणीतील आहेत, जे मुख्यत: बाजारातील तंत्रज्ञानाच्या प्रवेशामुळे उपेक्षित झाले आहेत.
 • या गटातील स्रियांना सशक्त बनवण्याची गरज आहे, जे त्यांच्या सकल घरगुती अडचणींमुळे सामान्यत: दीर्घकाळ काम करण्यास तसेच कधीकधी इतर शहरांत स्थलांतर करून आवश्यक रोजगार किंवा मजुरी मिळविण्यासाठी असमर्थ असतात.

या पोर्टलची काही वैशिष्ट्ये:

 • या पोर्टलवर मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मंत्रालयाच्या योजनांची माहिती एकाच जागी मिळू शकेल.
 • युवक-युवतींना त्यांच्या आवडीप्रमाणे हव्या त्या प्रशिक्षण संस्थेत आणि प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याची सुविधा.
 • वैयक्तिक माहितीशी संबंधित आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा.

कौशल्य विकासाशी संबंधित योजना:

अ) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (२०१५)

ब) राष्ट्रीय करिअर सेवा प्रकल्प (२०१५)

क) उपजीविकेसाठी कौशल्य संपादन आणि ज्ञानजागृती (संकल्प -SANKALP)

ड) कौशल्यचार्य पुरस्कार

इ) आत्मनिर्भर कुशल कर्मचारी नियोक्ता मॅपिंग (ASEEM – २०२०)

ई) श्रेयस पोर्टल (२०१९)

Contact Us

  Enquire Now