पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक डॉ. अब्दुल कादीर खान यांचे निधन
- अणुतंत्राची तस्करी आणि अवैध प्रसार प्रकरणी चर्चेत आलेले पाकिस्तानचे वादग्रस्त वैज्ञानिक डॉ. अब्दुल कादीर खान यांचे निधन झाले.
- पूर्ण नाव – डॉ. अब्दुल कादीर खान
- जन्म – १ एप्रिल १९३६, भोपाळ
- मृत्यू – १० ऑक्टोबर २०२१, इस्लामाबाद
- राष्ट्रीयत्व – पाकिस्तानी
महत्त्वाचे :
- स्वातंत्र्यापूर्वी १९३६मध्ये त्यांचा भोपाळमध्ये जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले. भौतिकशास्रात पदवी घेऊन जर्मनी व नंतर नेदरलँडमध्ये धातू अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि बेल्जियममध्ये पीएच.डी. मिळवली. त्यानंतर नोकरीनिमित्त नेदरलँडमध्ये स्थायिक झाले.
- तेथील फिजिकल डायनॅमिक रिसर्च लॅब या संस्थेत असताना त्यांचा परिचय युरेनियम समृद्धीकरण तंत्राशी झाला.
- १९७४मध्ये भारताने घेतलेल्या पहिल्या अणुचाचण्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार भुत्तो यांना पत्र लिहून पाकिस्तानने आपला अणुकार्यक्रम हाती घ्यावा याबाबत सूचना केल्या. तसेच या कामात आपण सहाय्य करू शकतो, असेदेखील सुचविले. यातूनच पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेच्या प्रवासाला सुरुवात झाली.
- खान यांच्या आधिपत्याखाली एक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. (खान रिसर्च लॅबोरेटरीज)
- त्याचीच परिणती पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी छगाई-I या सांकेतिक नावाने ५ अणुस्फोट चाचण्या केल्या. (भारताने ११ व १३ मे १९९८ राोजी पाोखरण II या अणुचाचण्या केल्या) आणि पाकिस्तान सातवे अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले.
खान आणि विवाद
- आपले अणुतंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान उत्तर कोरिया, इराक, इराण, लिबिया या देशांना पुरविल्याचे आरोप त्यावर करण्यात आले.
- त्यामुळे त्यांना २००४ सालापासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते.