पहिला जिल्हा रुग्णालय कामगिरी अहवाल, २०२१ नीती आयोगाकडून प्रकाशित
- नीती आयोगाने भारतातील जिल्हा रुग्णालयांच्या कामगिरीचे मुल्यांकन करणारा पहिला अहवाल ‘Best practices in the performance of District hospitals’ या नावाने ३० सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला.
- या अहवालासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि कुटुंब व कल्याण मंत्रालय यांची मदत घेण्यात आली.
- भारताच्या प्राथमिक आरोग्य सेवायंत्रणेचे वर्गीकरण ग्रामीण आणि शहरी असे करता येते.
- यामध्ये ग्रामीण भागात उपकेंद्र हे सर्वात लहान भाग आहे. त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र असते, त्याच्याहीवर १२०००० लोकसंख्येसाठी समुदाय आरोग्य केंद्र असते.
- या सर्वांवर जिल्हा रुग्णालयाचे नियंत्रण असते.
- या अहवालात जिल्हा रुग्णालयांचे खाटांच्या क्षमतेनुसार तीन प्रकारांत वर्गीकरण केले आहे.
१) लहान – (२०० पर्यंत खाटा)
२) मध्यम – (२०१-३०० खाटा)
३) मोठी – (३०१ – पासून पुढे)
- अहवालातील महत्त्वाच्या उपलब्धी
१) पुदुच्चेरीमध्ये भारतातील सर्वाधिक खाटांची उपलब्धता तर बिहारमध्ये सर्वात कमी खाटा उपलब्ध
२) २७ टक्केच जिल्हा रुग्णालयांमध्येच डॉक्टर: खाटा आवश्यक गुणोत्तर साध्य (१०० खाटांस २९ डॉक्टर)
३) जिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर सरासरी २७ रुग्णांना एक दिवसात तपासतो.