परकीय चलनसाठ्यात भारताचा चौथा क्रमांक
- परकीय चलनसाठ्यात भारत जगात चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर चौथ्या क्रमांकावर आहे.
पार्श्वभूमी :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार १६ जुलै २०२१ रोजी भारताचा परकीय चलन साठा ८३५ दशलक्ष डॉलर्सने वाढून ६१२.७३ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
सर्वाधिक परकीय चलन साठा असलेले देश :
क्र. | देश | परकीय चलनसाठा (अब्ज डॉलर्स) |
१ | चीन | ३३४९ |
२ | जपान | १३७६ |
३ | स्वित्झर्लंड | १०७४ |
४ | भारत | ६१२.७३ |
५ | रशिया | ५९७.४० |
परकीय चलनसाठ्यात कशाचा समावेश होतो?
१) मध्यवर्ती बँकेकडे असलेले परकीय चलन (FCA)
२) मध्यवर्ती बँकेकडील सोने
३) स्पेशल ड्रॉईंग राइट्स् (SDL) : सदस्य देशांचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) एकूण भांडवलातील वाटा.
४) रिझर्व्ह ट्रान्च पोझिशन (RTP) : सदस्य देशांचा IMF मधील असलेल्या भांडवलापैकी परकीय चलनाच्या स्वरूपातील वाटा.
भारताच्या परकीय चलनसाठ्यात वाढ होण्याची कारणे :
१) रिझर्व्ह बँकेकडील परकीय चलन ४६३ दशलक्ष डॉलर्सने वाढून ५६८.७४ अब्ज डॉलर्स झाले आहे.
२) सोने साठ्यात ३७७ दशलक्ष डॉलर्स वाढ होऊन ३७.३३ अब्ज डॉलर्स झाला आहे.
परकीय चलनसाठ्याचे महत्त्व :
१) परकीय व्यवहारतोलातील महत्त्वाचा घटक असून यामुळे परकीय व्यापारात तरलता राहते.
२) ज्या देशाचा परकीय चलनसाठा जास्त, त्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम असते.
परकीय चलनसाठ्यात वाढ करण्यासाठी सरकारचे प्रयत्न :
१) आत्मनिर्भर भारत
२) शुल्क सूट योजना (Duty Exemption Scheme)
३) निर्यात मालावर शुल्क किंवा कर माफी (Remission of Duty or Taxes on Export Product – RoDTEP)
४) निर्विक (निर्यात ऋण विकास योजना)
५) सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या सर्वोच्च देशांपैकी भारत एक आहे.