
पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी टंडन समिती
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाने वरिष्ठ पत्रकार आणि प्रसार भारतीचे सदस्य अशोक कुमार टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक दहा सदस्यीय समिती गठित केली आहे.
- ही समिती येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करेल.
पार्श्वभूमी :
- पत्रकार कल्याण योजनेद्वारा भविष्यातील दृष्टिकोन आणि जास्तीत जास्त पत्रकारांना या योजनेच्या कक्षेत सामावून घेण्यासाठी त्याचे निकष आणि मार्गदर्शक तत्त्वामध्ये बदल करण्याची गरज आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी असलेली स्थिती याविषयीची संहिता २०२० मध्ये लागू झाल्यानंतर श्रमिक पत्रकारांच्या व्याख्येची व्याप्ती वाढली आहे.
- या अंतर्गत पारंपरिक तसेच डिजिटल अशा दोन्ही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना सामावून घेण्यात आले आहे.
- शिवाय अधिस्वीकृतीधारक व अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही या योजनेअंतर्गत समानता प्रदान करून योजनेचे लाभ मिळवून देणे महत्त्वाचे आहे.
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अलिकडच्या काळात निधन झालेल्या पत्रकारांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी अशा १०० हून अधिक पत्रकारांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली आहे.
- या समितीच्या शिफारसींच्या आधारावर जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ मिळू शकेल अशी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सरकारला शक्य होईल.
समितीतील सदस्य :
- सच्चिदानंद मूर्ती (रेसिडेंट एडिटर, द वीक)
- शेखर अय्यर (मुक्त पत्रकार)
- अमिताभ सिन्हा (न्यूज 18)
- शिशिरकुमार सिन्हा (बिझनेस लाईन)
- रवींद्र कुमार (विशेष प्रतिनिधी, झी न्यूज)
- हितेश शंकर (पांचजन्यचे संपादक)
- स्मृतिकाक रामचंद्रन (हिंदूस्थान टाइम्स)
- अमित कुमार (टाइम्स नाऊ)
- वसुधा वेणुगोपाल (इकोनॉमिक टाइम्स)
- श्रीमती कांचन प्रसाद (अतिरिक्त महासंचालक, पीआयबी)