पढे़ भारत अभियान
- १ जानेवारी ते १० एप्रिल २०२२ अशा १०० दिवसांच्या कालावधीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘पढे़ भारत’ नावाने वाचन अभियान सुरू केले आहे.
- आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, २१ फेब्रुवारी देखील आपल्या समाजातील स्थानिक भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या मोहिमेशी जोडला गेला आहे.
- २०२० सालच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून हे अभियान असून यात मुलांसाठी स्थानिक/मातृभाषा/प्रादेशिक/आदिवासी भाषेतील वयोगटातील वाचन पुस्तकांची उपलब्धता सुनिश्चित करून मुलांसाठी आनंददायी वाचन संस्कृतीच्या संवर्धनावर भर दिला जाईल.
- ‘भारताला जागतिक ज्ञान महासत्ता’ बनवणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.
- सदर अभियान हे बालवाटिका ते इयत्ता ८वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांवर लक्ष केंद्रित करेल.
- ही मोहीम आधारभूत साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान (Foundational Literacy & Numeracy) अभियानाच्या दृष्टी आणि उद्दिष्टांशी देखील संरेखित करण्यात आली आहे.
- लहान मुले, शिक्षक, पालक, समुदाय, शैक्षणिक प्रशासक इत्यादींसह राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील सर्व भागधारकांचा सहभाग असणे हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
- केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी याअगोदर ५ जुलैला ऑनलाईन माध्यमातून निपुण (National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy) भारत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे हा कार्यक्रम राबवला जातो आहे.
- हा कार्यक्रम सर्व राज्यांमध्ये २०२०च्या नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबवला जाणार आहे.
- उद्देश : नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून २०२६-२७ पर्यंत ग्रेड-३ पर्यंत शिकणाऱ्या (म्हणजे वयोगट ३-९ वर्षे) सर्व विद्यार्थ्यांना आधारभूत साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान (Foundational Literacy & Numeracy) म्हणजेच वाचणे, लिहिणे आणि अंकगणित यांची क्षमता प्राप्त करून देणे.
- शालेय शिक्षणाच्या मूलभूत वर्षांमध्ये मुलांना शिक्षणापर्यंत पोहोच देण्यावर आणि त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यावर हे अभियान लक्ष केंद्रित करेल.
- शिवाय शिक्षक क्षमता बांधणी; उच्च क्षमता असणारे आणि वैविध्यपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने/शिक्षण सामग्रीचा विकास इत्यादी बाबींवर हे अभियान लक्ष केंद्रित करेल.