पंडित राजन मिश्र

पंडित राजन मिश्र

जन्म : १९५१ (वाराणसी)

निधन : २५ एप्रिल २०२१

 • भारतीय अभिजात शास्रीय संगीताच्या विश्वात बनारस घराण्याच्या ख्याल शैलीचे गायक
 • पंडित राजन मिश्र आणि त्यांचे धाकटे बंधू साजन मिश्र या जोडीने गेल्या काही दशकात लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केले.
 • पंडित मिश्र यांनी त्यांच्या आजोबांचे भाऊ बडे रामदास मिश्र, वडील हनुमानप्रसाद मिश्र तसेच काका गोपालप्रसाद मिश्र (सारंगीवादक) यांकडून गायकीचे शिक्षण घेतले.
 • वैशिष्ट्य : खास बनारसी ढंगाचा पेहराव, अतिशय नाजूक कोरलेली मिशी, तोंडात रंगलेला पानाचा विडा आणि चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य.
 • भारतीय संगीतातील राग आणि काळ यांची परंपरा याचे कटाक्षाने पालन करणारे सिद्धहस्त कलाकार.
 • कार्य : विविध राग आणि भक्तिरचना असलेले २० हून अधिक अल्बम्स
 • ‘भैरव से भैरवी तक’, ‘भक्ती’ यांसारख्या रचनांची निर्मिती.
 • सूरसंगम या चित्रपटात गायन – ‘आये सूर के पंछी आये’, ‘में का पिया बुलावे’, ‘हे शंकर’ ही गीते.
 • संगीत दौरे : मिश्र बंधूनी १९७८ मध्ये श्रीलंकेचा प्रथम दौरा केला.
 • यानंतर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, सिंगापूर, कतार, बांग्लादेश यांसारख्या जगातील अनेक देशांत मैफिली गाजवल्या.

सन्मान : 

 • १९७१ – भारत सरकारचा संस्कृती सन्मान
 • १९९४-९५ – गंधर्व सन्मान
 • १९९८ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
 • २००७ – पद्मभूषण
 • २०१२ – राष्ट्रीय तानसेन सन्मान

बनारस घराणे :

 • भारतीय कलांचे माहेरघर
 • गायन आणि वादनासाठी विशेष प्रसिद्ध
 • ख्याल, ठुमरी, होरी, कजरी, टप्पा, दादरा हे या घराण्याचे गायनातील प्रकार आहेत; तर तबला, बासरी, शहनाई ही वाद्यही फारच महत्त्वाची आहेत.

ख्याल गायन प्रकार :

 • पर्शियन भाषेतून आलेला शब्द याचा अर्थ विचार किंवा कल्पनाशक्‍ती असा होतो.
 • या शैलीच्या उदयाचे श्रेय अमीर खुस्रो यांना जाते.
 • या शैलीत शब्दाचा स्पष्ट उच्चार असून स्वरांमधून भावनेचे प्रकटीकरण केले जाते.
 • भगवान कृष्णाच्या स्तुतीसाठी या रचना सादर केल्या जातात.
 • ख्याल गायनात तानावर भर असल्यामुळे ध्रुवपदास अधिक महत्त्व.
 • यात बनारस आणि गयाची ठुमरी यांचा समावेश आहे.

बनारस घराण्यातील प्रसिद्ध संगीतज्ज्ञ

अ) ठुमरी गायक : रसूलन बाई, सिद्धेश्वरी देवी

ब) ख्याल गायक : पंडित बडे रामदास जी, पंडित महादेव प्रसाद मिश्र, राजन साजन मिश्र

क) शहनाई वादक : उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित रामसहाय मिश्र

ड) तबला वादक : पंडित किशन महाराज

इ) सितार वादक : पंडित रविशंकर

ई) सारंगी वादक : शंभू सुमीर, गोपाल मिश्र, हनुमान प्रसाद मिश्र, नारायण विनायक

भारतीय संगीतातील महत्त्वाचे घराणे :

 

अ. क्रमांक घराणे वैशिष्ट्ये संगीतज्ज्ञ
१) ग्वाल्हेर घराणे आधुनिक संगीताचे व्यासपीठ विष्णू दिगंबर पलुसकर, रामकृष्ण बुवा वझे
२) आग्रा घराणे नोम-तोम शब्द वापरून आलापी फैयाज खाँ
३) जयपूर घराणे स्वरसौंदर्यांवर भर, विलंवित तीनतालात गायन भास्करबुवा बखले, केसरबाई केरकर
४) किराणा घराणे आलापप्रधान व अतिविलंबीत गायिकी पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर

 

Contact Us

  Enquire Now