नोबेल पुरस्कार – २०२१

नोबेल पुरस्कार – २०२१

 • २०२१ चे नोबेल पुरस्कार विजेते 
अ. क्र. क्षेत्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती
वैद्यकशास्त्र किंवा शरीरविज्ञान १) डेव्हिड ज्युलियस (अमेरिका)

२) अर्डेम पॅटापॉशियन (अमेरिका)

भौतिकशास्त्र १) सुकुरो मनाबे (जपान)

२) क्लॉस हॅझलमन (जर्मनी)

३) गिओरगिओ पारिसी (इटली)

रसायनशास्त्र १) बेंझामिन लिस्ट (जर्मनी)

२) डेव्हिड डब्ल्यू सी मॅकमेलन (स्कॉटलँड)

एकापेक्षा जास्त वेळा नोबेल जिंकणाऱ्या संस्था

१) रेडक्रॉस (१९१७, १९४४, १९६३)

२) यू. एन. एच. सी. आर (१९५४, १९८०)

दोनदा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला – मेरी क्यूरी

पहिली नोबेल पुरस्कार विजेती महिला – मेरी क्यूरी

नोबेल पुरस्काराविषयी

 • स्थापना : १९०१ (आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ)
 • वितरण : दरवर्षी १० डिसेंबर रोजी (स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी)
 • शांततेच्या पुरस्काराचे वितरण ऑस्लो (नॉर्वेची राजधानी) येथे होते.
 • १९४० आणि १९४२ मध्ये हा पुरस्कार दिला गेला नाही.
 • एकावेळी जास्तीत जास्त ३ व्यक्तींना विभागून दिला जातो.
 • आल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्रज्ञाने १८६७ मध्ये ‘डाईनामाईट’ या स्फोटकाचा शोध लावला होता.
 • स्वरूप : ९० लाख स्वीडिश क्रोनर (९.८ लाख$) (२०१८ पासून)
 • सुरुवातीस – भौतिकशास्र, रसायनशास्र, वैद्यकशास्र, साहित्य आणि शांतता या पाच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थासाठी दिला जात होता.
 • सेंट्रल बँक ऑफ स्वीडनच्या स्थापनेला १९६८ मध्ये ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर १९६९ पासून अर्थशास्त्र या विषयातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात.
 • अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मूळ नाव ‘द स्वेरिंग्ज रिक्सबँक प्राइझ’ असे आहे. (अर्थशास्त्रातील नोबेल ६ क्षेत्रांत दिला जातो.)
 • सर्वात तरुण विजेता – मलाला यूसुफझाई (१७ वर्षे) (पाकिस्तान) शांतता (२०१४)
 • सर्वात वयोवृद्ध विजेता – जॉन. बी. गुडइनफ (९७ वर्षे) रसायनशास्त्र – २०१९

भारतीय नोबेल विजेते

१) रवींद्रनाथ टागोर – १९१३ – साहित्य

२) चंद्रशेखर व्यंकट रमन – १९३० भौतिकशास्त्र

३) डॉ. हरगोविंद खुराना – १९६८ – वैदकशास्त्रज्ञ

४) मदर टेरेसा – १९७९ – शांतता

५) डॉ. सुब्रमण्यम् चंद्रशेखर – १९८३ – भौतिकशास्त्र

६) डॉ. अमर्त्य सेन – १९९८ – अर्थशास्त्र

७) व्ही. एस.  नायपॉल – २००१ – साहित्य

८) व्यंकटरमण रामकृष्ण – २००९ – रसायनशास्त्र

९) कैलास सत्यार्थी – २०१४ – शांतता

१०) अभिजित बॅनर्जी – २०१९ – अर्थशास्त्र

नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. मात्र पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मात्र त्या व्यक्तीच्या नातेवाइकांना पुरस्कार प्रदान केला जातो.

आतापर्यंत दोन व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार दिला आहे.

१) ईरिकी अक्सेल कार्लफल्डेट

२) डॅक हमरस्कजोल्ड

भौतिकशास्त्र नोबेल

 • जागतिक तापमानवाढीतील बदलांचा अंदाज वर्तवण्यासाठी पृथ्वीच्या हवामानाचे प्रारूपीकरण करण्याच्या कामगिरीसाठी यंदा जपान, जर्मनी व इटली या तीन देशांच्या वैज्ञानिकांना नोबेल जाहीर करण्यात आले.

१) सुकुरो मनाबे – वय (९०)

 • जन्म – १९३१ शिंगू जपान
 • अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात वरिष्ठ हवामान तज्ज्ञ
 • तापमानवाढीच्या प्रारूपीकरणात महत्त्वाची भूमिका

२) क्लॉस हॅझलमन – वय (८९)

 • जन्म – १९३१, हॅम्बर्ग (जर्मनी)
 • मॅक्स प्लांक हवामानशास्त्र संस्थेत प्राध्यापक
 • जागतिक तापमानवाढीच्या प्रारूपीकरणात महत्त्वाची भूमिका

३) गिओरगिओ पारिसी – वय (७३)

 • जन्म – १९४८, रोम, इटली
 • इटलीतील सॅपिएन्झा विद्यापीठात प्राध्यापक
 • भौतिक प्रणालीमधील आंतरिक बदल हे आण्विक पातळीपासून ग्रहीय पातळीपर्यंत ओळखण्यासाठी संशोधन केले आहे.
 • मनाबे व हॅझलमन यांनी पृथ्वीच्या हवामानविषयक ज्ञानाचा पाया घातला व त्याचा मानवावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला.
 • १९६०मध्ये मनाबे यांनी दाखवून दिले की, वातावरणात वाढणारे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हे जागतिक तापमानवाढीस कारणीभूत आहे.
 • त्यातूनच सध्याच्या हवामान व तापमान प्रारूपांचा जन्म झाला.

वैद्यकशास्त्र नोबेल

 • तापमान आणि स्पर्शातून निर्माण होणाऱ्या संवेदकांवर संशोधन
 • यांच्या संवेदना मेंदूत कशा निर्माण होतात आणि आपली चेतासंस्था उष्णता, थंडी आणि यांत्रिक बलास कसा प्रतिसाद देते याचे स्पष्टीकरण ज्युलियस आणि पॅटॉपॉशियन यांनी केले.
 • या संशोधनाचा उपयोग वेदनांपासून मुक्ती देणारी नवी औषधे तयार करण्यासाठी होणार आहे.

१) डेव्हिड ज्युलियस – 

 • जन्म – न्यूयॉर्क
 • न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात संशोधन
 • डेव्हिड ज्युलियस यांनी तिखटातील कॅपॅसायसिन या घटकाचा वापर करून चेतातंतूतील उष्णतेला प्रतिसाद संवेदक शोधून काढला.

२) अर्डेम पॅटापॉशियन – 

 • जन्म – १९६७
 • पॅसाडेनातील कॅलिफोर्निया ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेत संशोधन यांनी दाब संवेदक पेशीचा वापर करून त्वचा व अंतर्गत अवयव बाह्य यांत्रिक बलास किंवा उत्तेजनेस कसा प्रतिसाद देतात ते शोधून काढले.

रसायनशास्रातील नोबेल

 • रसायनशास्रातील नोबेल पारितोषिक २०२१ बेंझामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यू सी मॅकमिलन यांना “असममित ऑर्गोनोकॅटालिसिसच्या विकासासाठी” देण्यात आले आहे.

Contact Us

  Enquire Now