
नासाची शुक्र मोहीम
- अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) शुक्रासाठी (Venus) नवीन मोहीम आखत आहे.
- १९९० नंतर शुक्रावरील नासाची ही पहिलीच मोहीम असेल.
- शुक्रावरील तापमान आणि फॉस्फिन घटक जे जीवनाच्या उपस्थितीतच शक्य आहेत, अंदाज वैज्ञानिकांनी वर्तविल्यामुळे शुक्र पुन्हा एकदा जगाच्या नजरेत आला आहे.
शुक्रावर पाठविण्यासाठी अमेरिकेचे दोन मिशन :
अ) दा व्हिन्ची प्लस (Da Vinci +)
ब) व्हेरिटास (Veritas)
अ) दा व्हिन्ची प्लस : (दाविन्सी + शुकाच्या वातावरणातील राजवायू, रसायनशास्त्र आणि इमेजिंगची तपासणी)
- शुक्र ग्रहावर फॉस्फिनच्या अस्तित्वाची खात्री करणे हे दा व्हिन्चीचे उद्दिष्ट आहे.
- त्याअंतर्गत अंतराळयानाद्वारे एक उपकरण या ग्रहावर पाठवले जाईल जे तेथील वातावरणात असलेल्या घटकांचा आणि वायूचा शोध घेईल.
ब) व्हेरिटास :
- हे रडार आणि स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्याने ग्रहाचा त्रिमितीय भौगोलिक नकाशा तयार करेल आणि पृष्ठभागाच्या रचनेचा अभ्यास करेल.
- ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे देखील मूल्यांकन करेल जेणेकरून गर्भात असलेल्या गोष्टींचा अंदाज घेतला जाऊ शकेल.
शुक्र ग्रह :
- सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह त्याच्या पृष्ठाचे तापमान शिसे (Lead) वितळण्याइतके उच्च म्हणजेच ५० अंश सेल्सियस इतके आहे.
- सौरमालेतील केवळ शुक्र व युरेनस ही दोन ग्रह स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात.
- पृथ्वी शुक्राच्या कक्षेच्या सर्वात जवळ आहे. तसेच दोन्हींचा आकार, वस्तुमान व रचना जवळजवळ समान आहेत, म्हणून शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह संबोधतात.
- शुक्राचे वातावरण दाट कार्बनडायऑक्साईडचे बनले आहे.
- शुक्राला स्वत:च्या आसाभोवती फिरण्यास लागणारा कालावधी : २४३ दिवस
- सूर्याभोवती फिरण्यास लागणारा कालावधी : २२४ दिवस
शुक्रावरील ऐतिहासिक मोहिम
वर्ष | मोहीम | देश |
१९९४ | मॅगेलन | अमेरिका |
२००५ | व्हीनस एक्सप्रेस | युरोप |
२०१० | अकात्झुकी | जपान |
शुक्रावरील भविष्यातील मोहिमा
- युरोपियन स्पेस एजन्सी (इसा) यिसस (Theseus) आणि स्पिका (Spica) या दोन खगोलशास्रीय प्रस्तावाबरोबर एनव्हिजन’ या शुक्रावरील मोहिमेचे मूल्यांकन करीत आहे.