नवीन निवडणूक आयुक्त – अनुपचंद्र पांडे
- भारतीय राज्यघटनेतील कलम 324 नुसार कार्यरत असलेल्या निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक व इतर 2 निवडणूक आयुक्त असतात.
- अनुपचंद्र पांडे यांची या त्रिस्तरीय निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.
- ते 1984 च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे सनदी अधिकारी आहेत.
- 2019 मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त.
- त्यांच्या मुख्य सचिव पदाच्या कार्यकाळातच 2019मध्ये उत्तरप्रदेश राज्याने भारतीय प्रवासी दिनाच्या निमित्ताने प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले.
- संरक्षण, कामगार व रोजगार मंत्रालयातही पदभार सांभाळला आहे.
- पुस्तक- प्राचीन भारतातील राज्यकारभार (Governance in Ancient India) यात त्यांनी ऋग्वेद काळापासून ते इसवी सनाच्या 650 पर्यंतच्या प्राचीन भारतीय नागरी सेवेची उत्क्रांती, स्वरूप, व्याप्ती व कार्ये इ. बाबींचा उल्लेख केला आहे.
निवडणूक आयोगही गातील सदस्य
अ) अध्यक्ष : मुख्य निवडणूक आयुक्त – सुनिल अरोरा
ब) निवडणूक आयुक्त :
-
- श्री. राजीव कुमार
- श्री. अनुप चंद्र पांडे
निवडणूक आयेाग : (घटनेचा भाग 15, कलम 324 ते 329)
- स्थापना : 25 जानेवारी 1950
- राष्ट्रीय मतदार दिवस : 25 जानेवारी 1950
- स्वरूप – घटनात्मक, स्थायी आणि स्वायत्त
- कलम 324 (1) नुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद सदस्य तसेच विधिमंडळ सदस्य या पदांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात.
- कलम 324 (2) निवडणूक आयोगाची रचना
- एक मुख्य निवडणूक आयुक्त व राष्ट्रपती आवश्यक वाटल्यास इतर निवडणूक आयुक्तांची संख्या ठरवतील.
- घटनादुरुस्ती – 65वी घटनादुरुस्ती कायदा, 1988 अन्वये मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या रचनेत बदल –
अ) 16 ऑक्टोबर 1989 – त्रिसदस्यीय
ब) 2 जानेवारी 1990 ते 30 सप्टेंबर 1993 – एकसदस्यीय
क) 1 ऑक्टोबर 1993 ते आजतागायत – त्रिस्तरीय
मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त-
- एखाद्या कामाबाबत मतभेद असल्यास निर्णय बहुमताने घेतला जातो.
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त व इतर दोन निवडणूक आयुक्तांना समान वेतन व भत्ते प्राप्त होतात.
कार्यकाळ-
- वयाच्या 65 वर्षापर्यंत किंवा नियुक्तीनंतर 6 वर्षांपर्यंत जो काळ आधी संपेल तोपर्यंत पदावर रहातात.
पदच्युती-
- आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे स्वेच्छेने सुपूर्द करून पदच्युत होऊ शकतात.
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या कारणासाठी व ज्या पद्धतीने पदावरून काढले जाते, त्याप्रकारेच मुख्य निवडणूक आयुक्त व इतर आयुक्तांना राष्ट्रपती पदावरून काढू शकतात. (गैरवर्तन व अक्षमतेच्या कारणावरून संसदेच्या ⅔ बहुमताने ठराव पारित करून)
मर्यादा-
- घटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांची पात्रता (कायदेशीर, शैक्षणिक, प्रशासकीय किंवा न्यायालयीन) विहित केलेली नाही.
- घटनेनुसार सेवानिवृत्त निवडणूक आयुक्तांना सरकारच्या कोणत्याही नियुक्तीपासून प्रतिबंधित केलेले नाही.
- राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास याचिका फक्त सर्वोच्च न्यायालयात मात्र संसद अथवा राज्य विधिमंडळ सदस्य निवडीसंबंधित वाद सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयात मांडता येतो.
अधिकार व कार्ये-
- मतदारयाद्या तयार करणे.
- मतदारसंघाची आखणी
- राजकीय पक्षांना मान्यता देणे व मतदान चिन्ह देणे.
- नामांकन पत्राची छाननी करणे.
- निवडणूक खर्चावर नजर ठेवणे.
महत्त्वपूर्ण कलमे-
कलम | तरतुदी |
324 | निवडणुकीवर देखरेख, निदेशन आणि नियंत्रण ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे अधिकार |
325 | धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून कोणत्याही व्यक्तीस मतदार यादीत समावेश करण्यासाठी अपात्र ठरविले जाणार नाही. |
326 | प्रौढ मताधिकाराने निवडणुका |
327 | विधिमंडळ निवडणुकांसंदर्भात तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार |
328 | विधिमंडळ निवडणुकांसंदर्भात तरतुदी करण्याचा संबंधित राज्य विधिमंडळाचा अधिकार |
329 | निवडणुकांसंदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालसास बंदी |