
नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेच्या अवर्षणग्रस्त भागाकडे
- पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- त्यामुळे कोकणात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेच्या अवर्षणग्रस्त भागाला उपलब्ध होणार आहे.
- त्याचबरोबर गुजरातकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणीही महाराष्ट्रात वळवले जाणार आहे.
- येत्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण असे १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे.
- पूर्व विदर्भ (वैनगंगा खोरे) अतिरिक्त पाणी उपलब्ध असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो.
- नार पार दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोरे, पिंजाळ, उल्हास खोरे यात अतिरिक्त असलेले पाणी अनुक्रमे विदर्भातील अवर्षणप्रवण भाग, मराठवाडा, आणि खानदेश, नाशिक तसेच मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाण्याकडे (घरगुती व औद्योगिक वापर) वळवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
- वळण बंधाऱ्यांना प्राधान्य देत हे प्रकल्प ‘मिशन मोड’ म्हणून हाती घेण्यात आले आहेत.
- पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा नळगंगा प्रकल्प हे जलसंपदा विभागाने हाती घेतलेले महत्त्वूपूर्ण प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभागाने कालबद्ध 9 कार्यक्रम घोषित केले आहेत.