
नंदकुमार महादेव नाटेकर
- जन्म : १२ मे १९३३
- निधन : २८ जुलै २०११
- वय : ८८ वर्षे
- बॅडमिंटनच्या जागतिक पातळीवर भारताचे नाव कोरणारे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू.
- टेनिसमध्ये सातवेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेले गौरव नाटेकर यांचे वडील.
- वर्णन : साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, पी. गोपीचंद आणि प्रकाश पदुकोण या बॅडमिंटनपटूच्या प्रभावळीतील पितामह.
कामगिरी :
- सहावेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद, पाचवेळा मिश्र दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी मिळविले.
- मलेशियातील सेलंगोर बॅडमिंटन स्पर्धा (१९५६) जिंकून आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळविणारे पहिले भारतीय
- १९६२ : किंग्स कप आंतरराष्ट्रीय स्पर्धा, बँकाॅकमध्ये नाटेकर आणि मीना शॉ यांनी मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले व त्याच स्पर्धेत १९६३ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद.
- १९६६ : जमैका येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व.
- जागतिक क्रमवारीत नाटेकर यांचे तिसरे स्थान.
- पुरुषांच्या थॉमस चषक स्पर्धेत १६ पैकी १२ एकेरी सामने त्यांनी जिंकले होते.
- १९८०-८१ मध्ये ज्येष्ठांच्या दुहेरी स्पर्धांमध्ये भाग.
- ते टेनिस, क्रिकेट तसेच गोल्फसुद्धा खेळायचे.
- कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महान टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांच्याकडून पराभवानंतर नाटेकर टेनिस सोडून बॅडमिंटन या खेळाकडे वळले.
पुरस्कार व सन्मान :
- १९६१ – अर्जुन पुरस्कार मिळविणारे पहिले बॅडमिंटनपटू
- १९६१ – देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूचा बहुमान
- १९८९ – आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेचा मेरिटोरियस ॲवॉर्ड
- १९९१ – जागतिक मराठी परिषदेकडून (मॉरिशस) सन्मानित
- २००१ – भारतीय पेट्रोलियम क्रीडा नियंत्रण मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार
- २००२ – ‘रत्न सौरभ’ – सह्याद्री नवरत्न पुरस्कार
- २०१७ – महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार
- १९९०-९४ – महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष