धोलाविरा व काकतीय रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

धोलाविरा व काकतीय रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

  • भारतातील काकतीय रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिर, तेलंगणा आणि हडप्पाकालीन शहर धोलाविरा गुजरात यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
  • युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या फुझहाऊ (चीन) येथे पार पडलेल्या ४४व्या आधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.
  • जुलै २०२१ पर्यंत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील ४० स्थळांचा समावेश झाला असून त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.

अ) सांस्कृतिक – ३२

ब) नैसर्गिक – ७

क) संमिश्र – १

अ) काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर, तेलंगणा :

  • तेलंगणा राज्यातील वारंगलजवळील पालपेट येथील प्राचीन शिवमंदिर आहे.
  • काही शिलालेखांनुसार, काकतीय राजा गणपतीदेवाच्या काळात इसवी सन १२१३ च्या आसपास मुख्य सेनापती रिचेश रुद्रच्या देखरेखीखाली बांधण्यात आले.

 

  • वैशिष्ट्ये :

 

१) या मंदिराला एक हजार खांब आहेत, जे ग्रॅनाइट आणि डोलोराइटपासून बनले आहे.

२) शिल्पकाराच्या नावाने ओळखले जाणारे भारतातील एकमेव रामालिंगेश्वराचे हे मंदिर आहे.

३) हलक्या सच्छिद्र विटांमुळे (फ्लोटिंग ब्रिक्स) मंदिराच्या छतावरील संरचनेचे वजन कमी झाले आहे.

४) मंदिराची उच्च कलात्मक मूर्ती प्रादेशिक नृत्य प्रथा आणि काकतियन संस्कृती दर्शवते.

  • शिल्पकार : रामप्पा
  • मंदिरासाठी एका युरोपियन प्रवाशाने काढलेले उद्‌गार : ‘दक्खनच्या मध्ययुगीन मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा’

 

ब) धोलाविरा : हडप्पाकालीन शहर

 

  • उत्खनन : १९६०-२००५ (रवींद्र सिंग बिश्त)
  • शोध : जगत्पति जोशी (१९६८)
  • गुजरातमधील चौथे, भारतातील ४० वे, तर प्राचीन सिंधू संस्कृतीतील भारतातील पहिलेच स्थळ आहे.
  • ख्रिस्तपूर्व २६५० मध्ये हे शहर वसवले गेले तर ख्रिस्तपूर्व २१०० मध्ये याच्या अधोगतीस सुरुवात झाली.
  • कच्छच्या रणातील खादीर बेटावर धोलाविरा हे शहर स्थित आहे.

 

  • वैशिष्ट्ये :

 

१) प्रागैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृती :

    • या ठिकाणी हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृती व अखेरचा काळ या सर्व खुणा आढळतात.
    • ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्रकापर्यंत बहु-सांस्कृतिक आणि विभाजित संस्कृतीचे पुरावे

२) नगररचना :

    • शहर वसवण्याच्या आधीच केलेले नियोजन, बहुस्तरीय तटबंदी नऊ प्रवेशद्वार, सुनियोजित सुबक जलाशये, सांडपाणी व्यवस्था, बांधकामासाठी दगडाचा वापर करत असत.

३) जलव्यवस्थापन प्रणाली :

    • पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळविणे, कमी पर्जन्यमान व उपलब्ध भूजलाचा वापर, मोठमोठ्या दगडी जलाशयात त्याची साठवणूक तसेच खडकात खोदलेल्या विहिरी इ.

४) व्यापार :

      • सध्याच्या राजस्थान, ओमान, दुबई येथून कच्चे तांबे खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून निर्यात करत असत.
      • मेसोपोटेमियाशी व्यापार

 

अस्त :

 

१) मेसोपोटेमिया पडल्यानंतर स्थानिक खाणकाम, उत्पादन, निर्यातीवर विपरीत परिणाम

२) हवामान बदलामुळे सरस्वतीसारख्या नद्या कोरड्या पडल्या. परिणामी लोकांनी गंगा नदीचे खोरे तसेच दक्षिण गुजरातकडे पलायन केले.

 

संवर्धन :

 

१) युनेस्कोने आपल्या प्रसिद्धीपत्रकात धोलाविराला दक्षिण आशियातील सर्वात उल्लेखनीय आणि चांगल्या प्रकारे संरक्षित शहरी वस्ती म्हणून संबोधले आहे.

२) उत्खनन झाल्यापासून आर्किअॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे येथे संग्रहालय विकसित केले आहे.

 

प्राचीन सिंधू संस्कृतीमधील ५ मोठी महानगरे : 

 

क्रमांक

देश

शहर

१)

पाकिस्तान

मोहेंजोदारो

गनवेरीवाला

हडप्पा

२)

भारत

राखीगडी

धोलाविरा

 

 

युनेस्कोची जागतिक वारसा यादी

 

  • सुरुवात : १९७२
  • एकूण ठिकाणे : ११४९ (सांस्कृतिक – ८९३, नैसर्गिक – २१७, मिश्र – ३९)

 

सर्वाधिक वारसा स्थळे असणारे देश :

 

१) इटली (५७)

२) चीन (५६)

३) जर्मनी (५१)

४) स्पेन (४९)

५) फ्रान्स (४८)

 

निकष 

 

१) जागतिक वारसा स्थळांना युद्धकाळात नुकसान पोहोचू नये किंवा ती नष्ट होऊ नये यासाठी ही स्थळे युनेस्कोने जिनिव्हा कन्व्हेन्शन करारांतर्गत संरक्षित केलेले असतात.

२) जागतिक वारसा स्थळाची निवड होण्यासाठी प्रथम युनेस्कोचे नामांकन मिळावे लागते, त्यासाठी युनेस्कोच्या संभाव्य यादीत त्या स्थळाचे नाव असावे लागते.

जागतिक वारसा दिन : १८ एप्रिल

भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी

क्र.

स्थळ राज्य

वर्ष

अ) सांस्कृतिक स्थळे
अजिंठा लेणी महाराष्ट्र १९९३
वेरुळ लेण्या महाराष्ट्र १९८३
आग्रा किल्ला उत्तरप्रदेश १९८३
ताज महाल उत्तरप्रदेश १९८३
कोणार्क सूर्यमंदिर ओदिशा १९८४
महाबलीपुरम स्मारक समूह तमिळनाडू १९८५
गोव्यातील चर्च गोवा १९८६
खजुराहो स्मारके मध्यप्रदेश १९८६
हंपीमधील मंदिरे कर्नाटक १९८६
१० फतेहपूर सिक्री उत्तरप्रदेश १९८६
११ पट्‌टडकलमधील मंदिरे कर्नाटक १९८७
१२ एलिफंटा लेणी महाराष्ट्र १९८७
१३ चोल मंदिरे तमिळनाडू १९८७
१४ सांची बौद्ध स्तूप मध्यप्रदेश १९८९
१५ हमायूनचे थडगे दिल्ली १९९३
१६ कुतुबमिनार दिल्ली १९९३
१७ माउंटन रेल्वे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश १९९९, २००५, २००८
१८ महाबोधी मंदिर बिहार २००२
१९ भीमबेटका रॉक शेल्टर मध्यप्रदेश २००३
२० छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराष्ट्र २००४
२१ चंपानेर-पावगड पुरातत्त्व उद्यान गुजरात २००४
२२ लाल किल्ला दिल्ली २००७
२३ जंतर-मंतर, जयपूर राजस्थान २०१०
२४ राजस्थानचे डोंगरी किल्ले (चित्तोडगड, कुंभलगड, रणथंबोर, जैसलमेर, आमेर, ग्रॅगोन इ.) राजस्थान २०१३
२५ राणी की बाव गुजरात २०१४
२६ नालंदा विद्यापीठ बिहार २०१६
२७ ली कॉर्बुजिए (कॅपिटल इमारत संकुल चंदीगड २०१७
२८ अहमदाबाद शहर गुजरात २०१७
२९ व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको शैलीतील वास्तू महाराष्ट्र २०१८
३० जयपूर शहर राजस्थान २०१९
३१ काकतीय रुद्रेश्वर मंदिर तेलंगणा २०२१
३२ धोलाविरा : हडप्पाकालीन शहर गुजरात २०२१
ब) नैसर्गिक स्थळे
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम १९८५
मानस राष्ट्रीय उद्यान आसाम १९८५
केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान १९८५
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल १९८७
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड १९८८
पश्चिम घाट २०१२
ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान संवर्धन क्षेत्र हिमाचल प्रदेश २०१४
क) मिश्र वारसा स्थळे
कांचनझुंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम २०१६

 

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यावर मिळणारे फायदे :

 

१) त्या स्थानाच्या जतन व संवर्धनासाठी युनेस्कोकडून अनुदान प्राप्त होते.

२) रोजगार व पर्यटनाला चालना मिळते.

३) देशाला परकीय चलन प्राप्त होते.

Contact Us

    Enquire Now