देशातील पहिले वॉटर व्हिलाज्‌ लक्षद्वीपमध्ये उभारले जाणार

देशातील पहिले वॉटर व्हिलाज्‌ लक्षद्वीपमध्ये उभारले जाणार.

  • 800 कोटींचा खर्च करून लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये सौर उर्जेवर चालणारे आणि पर्यावरणस्नेही वॉटर व्हिलाज्‌ उभारण्यात येणार आहेत. 
  • वॉटर व्हिलाज्‌ (Water Villas) हे पाण्यामध्ये उभारण्यात येणारे टुमदार निवास असतात. 
  • हे वॉटर व्हिलाज्‌ मालदीवमध्ये असणाऱ्या वॉटर व्हिलाज्‌च्या धर्तीवर उभारण्यात येतील.
  • पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन क्षेत्राला वाढीस लावणे व तेथील स्थानिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रोत्साहन देणे हा उद्देश यामागे आहे.

 

  • लक्षद्वीप : हा भारतातील सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश असून कवरत्ती लक्षद्वीपची राजधानी आहे. सध्या प्रफुल्ल खोडा पटेल हे लक्षद्वीपचे प्रशासक आहेत.

 

 

Contact Us

    Enquire Now