देशातील पहिले दुगोंग संवर्धन राखीव

देशातील पहिले दुगोंग संवर्धन राखीव

  • तमिळनाडूमध्ये देशातील पहिले दुगोंग संवर्धन राखीव (conservation reserve) स्थापन करण्यात येणार आहे.

दुगोंग संवर्धन राखीव :

  • क्षेत्र : ५०० किमी (आदिरामपट्टीनम ते अमापट्टीनमपर्यंत, तमिळनाडू)
  • पाल्कच्या उपसागरात (पाल्कच्या सामुद्रधुनीचा नैर्ऋत्येकडील भाग) तमिळनाडूच्या दक्षिणेकडील सागरी प्रदेशात मोठ्या प्रमाणात दुभोंग आढळतात.
  • उद्देश : दुगोंग व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे.
  • CAMPA – दुगोंग पुनःप्राप्ती प्रकल्पाचा भाग म्हणून नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१९ दरम्यान पाल्क उपसागर आणि मन्नारच्या आखातात विविध सर्वेक्षण करण्यात आले.

दुगोंग

  • हा शाकाहारी सागरी सस्तन प्राणी असून, यास समुद्री गाय असेही म्हणतात.
  • ते समुद्री गवतावर जगतात व श्वासोच्छवासासाठी ते पृष्ठभागावर येतात.
  • ३० हून अधिक देशांत ते आढळतात, भारतात मुख्यत्वे मन्नारचे आखात, कच्छची खाडी, पाल्क उपसागर अंदमान आणि निकोबार बेटांवर आढळून येतात.
  • वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (WII) अंदाजानुसार, सध्या २०० ते २५० जंगली दुगोंग शिल्लक आहेत, त्यापैकी १५० दुगोंग हे पाल्क उपसागर तमिळनाडूतील मन्नारच्या आखातात आढळतात.

 

  • धोका :

 

अ) समुद्री गवताच्या अधिवासात घट

ब) जलप्रदूषण

क) विकासात्मक उपाययोजनांमुळे किनारी परिसंस्थेचा ऱ्हास

ड) मासेमारीच्या जाळ्यात अडकणे

इ) बोटी तसेच ट्रॉलर्सशी टक्का

 

  • संवर्धन स्थिती :

 

अ) आययूसीएन : असुरक्षित

ब) साइट्‌स् (CITES) : परिशिष्ट I

क) वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ : परिशिष्ट I

 

  • संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve zone) :

 

    • वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत ही क्षेत्रे संरक्षित केली जातात.
    • संवर्धन राखीव वनक्षेत्र निर्मितीसाठी लोकांचे व गावाचे पुनर्वसन करावे लागत नाही, यामुळे स्थानिकांचा फारसा विरोध होत नाही.
    • १९९८ च्या वन धोरणामध्ये जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत स्थानिक लोकांचा जंगल संवर्धन आणि जतन उपक्रमात सहभाग समाविष्ट करून घेण्यात आला, याचेच सुधारित रूप म्हणजे संवर्धन राखीव कायदा.
    • वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मध्ये आवश्यक बदल करून २००२-०३ मध्ये संवर्धन राखीव कायद्याचा समावेश करण्यात आला. यानुसार देशातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र केरळमध्ये उभारण्यात आले.
    • भारतात सध्या ९७ वनक्षेत्रे संवर्धन राखीव क्षेत्रे म्हणून संरक्षित करण्यात आहेत.

 

  • महाराष्ट्रात सात संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत.
क्र. संवर्धन राखीव क्षेत्र जिल्हा स्थापना क्षेत्र (चौ. किमी)
१. बोरखडा नाशिक २००८ ३.४९
२. कोलामारका गडचिरोली २०१३ १८०.७०
३. मुक्ताईभवानी जळगाव-धुळे २०१४ १२२.२४
४. ममदापूर नाशिक २०१४ ५४.४६
५. तोरणमाळ नंदूरबार २०१६ ९३.४२
६. अंजनेरी नाशिक २०१७ ५.६९
७. तिलारी कोल्हापूर २०२० २९.५३

Contact Us

    Enquire Now