
दीपक दास भारताचे २५ वे महालेखापाल (CGA)
- १९८६ च्या तुकडीचे ICAS (Indian Civil Accounts Service) अधिकारी दीपक दास यांची २५वे महालेखापाल म्हणून केंद्र शासनाने नियुक्ती केली. (१ ऑगस्ट २०२१ पासून)
- यापूर्वी त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे मुख्य प्रबंधक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
- राज्यघटनेच्या कलम १५० नुसार केंद्र व राज्य शासनाच्या लेख्यांचे स्वरूप विहित करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर आहे.
- ऑक्टोबर १९७६ मध्ये हे पद निर्माण करण्यात आले.
- राष्ट्रपतींच्या या अधिकारांची जबाबदारी CGA यांच्यावर असते.
- CGA हे आर्थिक लेखेविषयक कामांबद्दल भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात.
- भारताचे पहिले CGA – सी. एस. स्वामीनाथन (१९७६-७७)