दिल्लीत देशातील पहिला स्माॅग टॉवर

दिल्लीत देशातील पहिला स्माॅग टॉवर

  • राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारद्वारा दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये (Connaught Place) देशातील पहिला स्मॉग टॉवर उभारण्यात आला आहे.

पार्श्वभूमी:

  • दिल्लीतील आनंद विहारमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी जानेवारीत केंद्र सरकारला स्मॉग टॉवर उभारण्याचे निर्देश दिले होते.
  • तसेच दिल्ली सरकारला तीन महिन्यांत कॅनॉट प्लेस भागात अशाच प्रकारचा टॉवर उभारण्याचे निर्देश दिले होते, ज्याला ऑक्टोबर २०२०मध्ये दिल्ली मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

स्मॉग टॉवरविषयी:

  • चीनने राजधानी बीजिंग आणि इतर शहरांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रयोग केला आहे आणि या धर्तीवरच भारतातही दिल्ली क्षेत्रात स्माॅग टॉवर बसवले जात आहेत.
  • ही यंत्रणा अमेरिकेतून आयात करण्यात आली आहे.
  • या टॉवरची उंची २४.२ मीटर्स असून त्याचे क्षेत्रफळ ७८४.५ चौरस मीटर इतकी आहे.
  • हा टॉवर एक किलोमीटर क्षेत्रातील प्रदूषित हवा खेचून स्वच्छ हवा १० मीटर्स उंचीवर सोडणार आहे.
  • टाॅवरला एकूण ४० पंखे असून यांद्वारे एक हजार घनमीटर प्रतिसेकंद फिल्टर हवा बाहेर सोडली जाईल.
  • टॉवर कार्यान्वित झाल्यानंतर आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईच्या माध्यमातून त्याच्या कार्यक्षमतेचे पुढील दोन वर्षांत विश्लेषण केले जाईल.

टॉवरचा विकास:

  • आयटी बॉम्बे व आयटी दिल्ली यांच्या तांत्रिक सहाय्याने टाटा प्रोजेक्ट लिमिटेड द्वारे बांधण्यात आले आहे.

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार: राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समिती इंडिया लिमिटेड (National Biofuel Coordination Committee Ltd.)

प्रकल्पाची जबाबदारी: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती.

गरज:

  • मार्चमध्ये प्रकाशित होणाऱ्या स्विस ग्रुपच्या अहवालानुसार, २०२०मध्ये सलग तिसऱ्या वर्षी दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर होते.
  • हा अहवाल अल्ट्राफाइन पार्टिक्युलेट मॅटरच्या पातळीनुसार (PM २.५) हवेच्या गुणवत्तेवर आधारित शहरांची क्रमवारी दर्शवितो.
  • शहरातील हवा गुणवत्तेचा निर्देशांक १८१ इतका असून नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विविध भागात तो १,००० पर्यंत जातो १००च्या वर वायू गुणवत्ता निर्देशांक आरोग्यास हानिकारक असतो.

उच्च प्रदूषणपातळीमागील कारणे:

  • बांधकाम औद्योगिक तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण.
  • हिवाळ्याच्या सुरुवातीला वायव्येकडील राज्यात (पंजाब-हरियाणा) यांसारख्या मोठ्या शहरात पीक कापणीनंतर उरणारा पेंढा जाळल्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण वाढत आहे; यामुळे श्वास घेण्यासाठी अडथळे, डोळ्यांची जळजळ, सायनस, खोकला आणि फुप्फुसांसंबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.

प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना:

  • पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांना खत (पेंढा) जाळण्यासाठी यांत्रिक पर्याय वापरण्यास प्रवृत्त करणे.
  • दिल्लीतील औष्णिक विद्युत केंद्रे बंद करणे.
  • उद्योगांद्वारा पाईपयुक्त नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देणे.
  • प्रदूषण पातळी वाढली की, ग्रेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (जीआरएपी) अंतर्गत घेतलेल्या उपाययोजना.
  • एप्रिल २०२० मध्ये दिल्लीतील १४ मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी अँटिस्माॅग गन्स बसविण्यात आल्या आहेत.

Contact Us

    Enquire Now