तोशिहिडे मासकावा
- जन्म – ७ फेब्रुवारी १९४० (जपान)
- मृत्यू – २३ जुलै, २०२१ क्योटो (जपान)
- विश्वाचा वेध घेण्याचे कार्य न्यूटननंतर ज्या अनेक भौतिकशास्त्रज्ञांनी केले, त्यांच्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तोशिहिडे मासकावा. यांचे निधन वयाच्या ८१व्या वर्षी झाले.
- २००८ मध्ये त्यांना खंडित सममितीच्या शोधाकरिता अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ थोईशिरी नंबू यांच्यासह नोबेल पुरस्कार मिळाला होता.
- २०१० पासून नागोया विद्यापीठातील कोबायाशी-मासकावा इन्स्टिट्यूटचे ते पहिले संचालक ठरले, कणांचा व विश्वाचा शोध घेण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
- भौतिकशास्त्रज्ञांना असे वाटत होते की, मूलभूत कणांची सममिती सर्व परिस्थितीत सारखीच लागू पडते. नंतर लक्षात आले की भारित सममिती किरणोत्सर्जनातील बीटा क्षरणात मोठी भूमिका पार पाडते.
- नंतर शियान शुंग वू व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दाखवून दिले की, जेव्हा बीटा क्षरण होत असते तेव्हा कोबाल्टच्या अणूतून काही इलेक्ट्रॉन विशिष्ट दिशेने बाहेर पडतात. त्यासाठी त्यांना १९५७चे नोबेल पुरस्कार मिळाले होते.
- १९८० मध्ये नोबेल पटकवणाऱ्या जेम्स क्रोनिन व व्हॅल फिच यांच्या संशोधनाच्या पलिकडेही जी सममिती संरचना होती ती मासकावा यांनी शोधून काढली.
- त्यातून मासकावा व कोयाबाशी यांनी जी गणिती आकडेमोड केली, त्यात १९७२ मध्ये विचित्र वर्तनाच्या क्वार्कचा शोध लागला.