डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका भारत पाटणकर :
- जन्म: २ ऑगस्ट १९४१ (मिनेआपोलिस)
- निधन: २४ ऑगस्ट २०२१
- आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ संशोधक, लेखक, स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या.
- गेल यांनी गौतम बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तिवादी विचारांची संत साहित्याची नव्याने मांडणी केली.
- अमेरिकेतील कार्लेटॉन महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली या विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर पीएच.डी. साठी त्या भारतात आल्या.
- महात्मा फुले यांच्या चळवळीवर आधारित ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड (कल्चरल रिवॉल्ट इन कलोनियल सोसायटी)’ हा प्रबंध पी.एच.डी. ला असताना बर्फली विद्यापीठाला सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
- प्रबंध पूर्ण झाल्यानंतर त्या अमेरिकेसारख्या प्रगत देशात न राहता भारतातच राहू लागल्या.
- येथे त्यांनी भारतातील दलित चळवळ, आदिवासी समाज, महिलांचे सामाजिक स्थान आणि त्यांची उन्नती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळी तसेच शेतकरी लढ्यांचा अभ्यास केला.
- महाराष्ट्रात कामगार वर्गात सक्रिय असलेल्या लाल निशाण पक्षाच्या त्या संपर्कात होत्या.
- महाराष्ट्रातील स्त्रियांच्या चळवळीत ‘मुक्ती’ हा शब्द वापरण्याचा आग्रह त्यांनी केला. उदा. स्त्रीमुक्ती संघटना किंवा स्त्रीमुक्ती संघटना यात्रा.
प्राध्यापिका म्हणून कार्य :
- ओदिशातील निस्वास विद्यापीठात आंबेडकर चेअरच्या प्राध्यापिका.
- इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज, कोपेनहेगन.
- नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी, नवी दिल्ली.
- सिमला इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स.
- पुणे विद्यापीठ, समाजशास्त्र विभाग.
लेखन कार्य :
- वारकरी संप्रदायाच्या भक्ती या विषयावर विशेष लिखाण.
- देशातील आणि जगभरातील नामवंत वृत्तपत्रे, नियतकालिकांत लिखाण.
- हार्वर्डसह अनेक विद्यापीठांत संशोधनपर निबंध.
पुस्तके :
- कल्चरल रीव्होल्ट इन कोलोनियल सोसायटी: द नॉन ब्राम्हिण मूव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया.
- सिंकिंग बेगमपुरा
- बुद्धिझम इन इंडिया
- दलित ॲण्ड द डेमोक्रॅटिक रिव्होल्यूशन
- संभाजी तुकाराम गायकवाड ॲण्ड द कोकण दलित्स
- महात्मा ज्योतिबा फुले
- अंडरस्टँडिंग कास्ट
- वुई विल स्मॅश दी प्रिझन