डिंको सिंग

डिंको सिंग

 • जन्म – १ जानेवारी, १९७९ (मणिपूर)
 • मृत्यू – १० जून २०२१
 • माजी आशियाई सुवर्णपदक विजेते बॉक्सिंगपटू आणि मेरी कोमसह भारतातील सर्वच आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणा देणारे डिंको सिंग यांचे इंफाळ येथे निधन झाले.
 • ते ४२ वर्षांचे होते. यकृताच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.
 • ५४ किलो वजनी गटात प्रतिनिधित्व करत डिंको सिंग १९९८ च्या बॅंकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत बाजी मारत भारताचा या स्पर्धेतील सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला.
 • डिंको यांनी १६ वर्षांनी हे सुवर्णपदक जिंकले होते. याआधी १९८२ मध्ये कौर सिंगने भारताला सोनेरी यश मिळवून दिले होते.
 • डिंकोने अवघ्या १०व्या वर्षी उपकनिष्ठ गटात कारकीर्दीतील पहिले राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
 • भारतीय बॉक्सिंग क्षेत्रातील पहिला आधुनिक तारा म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती.
 • २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. परंतु उपांत्यपूर्व फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले.

पुरस्कार

 • १९९८ – अर्जुन पुरस्कार
 • २०१३ – पद्मश्री पुरस्कार

Contact Us

  Enquire Now