ट्वेन्टी – २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताऐवजी अमिरातीत
- ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोरोनामुळे भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येईल असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जाहीर केले.
- इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) उर्वरित हंगामदेखील अमिरातीत होणार आहे.
- विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल अशी चर्चा आहे, पण गांगुलीने अद्याप याविषयी काहीही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले आहे.