‘टाईम’ घोषित : जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्ती (TIME 100)

‘टाईम’ घोषित : जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्ती (TIME 100)

  • २०२१ सालची जगातील सर्वाधिक प्रभावशाली अशा १०० व्यक्तींची यादी टाईम मासिकाने सप्टेंबर २०२१ मध्ये जाहीर केले. 
  • टाईम हे अमेरिकन मासिक १९९८ पासून व्यक्तींना असा दर्जा देते.

या यादीत समाविष्ट भारतीय व्यक्ती (एकूण ३)

  • १) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • २) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
  • ३) सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला
  • या यादीतील १०० व्यक्तींची क्रमवारी लावली जात नाही. म्हणजेच त्यांना १, २, ३ ——- असे क्रमांक दिले जात नाही.
  • २०२१ सालच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, ड्यूक ॲण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी व मेघन तसेच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच  . तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.
  • २०२० साली टाइमच्या यादीत ५ भारतीय व्यक्तींचा समावेश होता.
  • टाइमने म्हटले की, ममता बॅनर्जी यांच्या रूपाने भारतातील राजकारणात निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला.
  • ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे नेतृत्व केले नाही तर त्या म्हणजेच पक्ष आहेत.
  • अदार पूनावाला यांच्याबद्दल चाळीस वर्षीय पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या कंपनीचे नेतृत्व करीत आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल म्हटले की, भारताला तीन नेत्यानी दिशा दिली नेहरू, इंदिरा गांधी व तिसरे व्यक्ती नरेंद्र मोदी.

Contact Us

    Enquire Now